बहुप्रतीक्षित बुटीबोरी बसस्थानकातून धावणार एसटी

मुख्यमंत्री शिंदे यांनी केले ऑनलाइन लोकार्पण

नगराध्यक्ष बबलू गौतम यांची उपस्थिती

बुटीबोरी आशिया खंडातील नामांकित औद्योगिक क्षेत्र म्हणून

बुटीबोरी शहराची ओळख आहे.
याठिकाणी लाखो नागरिकांचे वास्तव्य आहे. सभोवतालील इतर गावांना जोडणारी एकमेव बाजारपेठ म्हणूनही बुटीबोरी शहराकडे बघितले जाते. मात्र मागील अनेक वर्षांपासून याठिकाणी नागरिकांना हक्काचे बसस्थानक नव्हते. तीन वर्षांपूर्वी हे बसस्थानक बांधण्यात आले नुकतेच या बसस्थानकाचे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले बसस्थानकाअभावी नागरिकांची गैरसोय होत होती.

स्थानिक लोकप्रतिनिधींचा सततचा पाठपुरावा आणि आमदार समीर मेघे यांच्या प्रमुख पुढाकारातून शहरासाठी सुसज्ज अशा बसस्थानकाला मंजुरी मिळाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या बसस्थानकाचे २०१७ ला भूमिपूजन झाले होते. २८ डिसेंबर २०१७ च्या करारानुसार या बसस्थानकाचे बांधकाम १५ महिन्यांत पूर्ण करावयाचे होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे बांधकाम रखडले होते. दरम्यान, याठिकाणी असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला.

स्थानिकांच्या डोकेदुखीत वाढ झाली. त्यानंतर नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. अखेर, नागरिकांच्या नाराजीचा सूर लक्षात घेता रस्त्याचा अडथळा दूर करण्यात आला. लोकप्रतिनिधी तसेच राज्य परिवहन मंडळाच्या संयुक्त पुढाकारातून बसस्थानक नागरिकांकरिता सुरू व्हावे यासाठी लोकार्पण करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाइन या बसस्थानकाचे १४ जूनला लोकार्पण सोहळ्याला नगराध्यक्ष बबलू गौतम, उपाध्यक्ष अविनाश गुर्जर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे शिक्षण सभापती विनोद लोहकरे,

वसंत जेऊरकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक गुर्जर, पंचायत समिती सदस्य मधू वालके, नियोजन सभापती अनिस बावला, आरोग्य सभापती अरविंद जयस्वाल, नगरसेवक सन्नी चौहान यांच्यासह रापमंचे प्रादेशिक अभियंता राजगुरे, वर्धमाननगर आगार व्यवस्थापक ललिता भोयर, कार्यकारी अभियंता गौड, विभागीय भांडार अधिकारी बोपचे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती संचालन एसटी आगाराचे वरिष्ठ लिपिक कृष्णकुमार शेरकर यांनी केले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *