नागपूर – बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणत गांजा तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळताच पथकाने त्वरित सापळा रचून आरोपीस १३ किलो गांजासह ताब्यात घेतले. ही कारवाई एमआयडीसी बुटीबोरी परिसरात काल (दि. ८) यशस्वी करण्यात आली. दर्शन रत्नाकर पारेकर (३०), रा. वॉर्ड क्र. ४, टाकळघाट असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकास मिळाली होती. त्या अनुषंगाने पथकाने काल सोमवारी ही कारवाई केली. यावेळी आरोपीच्या ताब्यातून १३.३२२ किलो गांजा किंमत १,३२,५४० रुपये जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली परि सहायक पोलिस अधीक्षक अनिल मस्के, परि. पोलीस उपअधीक्षक राहुल झालटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहा. पोलीस निरिक्षक राजीव कर्मलवार, अनिल राऊत, पोलीस उपनिरीक्षक आशीष मोरखेडे, पोलीस हवालदार मिलींद नांदुरकर, नीलेश बर्वे, दिनेश आधापुरे, मयूर ढेकले, इकबाल शेख, महेश जाधव, सत्यशील कोठारे, किनगे, डाखोरे, बांगडे आदींनी यशस्वी केली.