नागपूर/२९ ऑगस्ट :- टाकळघाट येथील विकतूबाबा प्रतिष्ठान मध्ये मंगळवार दि २७ ऑगस्ट ला सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास अत्यंत दुर्मिळ जातीचा पोवळा विषारी साप आढळुन आला.त्यामुळे तिथे उपस्थिती असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळची वेळ असल्याने विकतू बाबा प्रतिष्ठानात भाविकांची खूप गर्दी सुद्धा होती, त्यामुळे हा विषारी साप एखाद्याला चावला तर अशी भीती सर्वांना अस्वस्थ करीत होती. अशातच येथेच राहणारे समाजसेवक अक्षय बहादुरे यांनी तात्काळ टाकळघाट येथील सर्प मित्र निखिल डाखोळे यांना फोन वरून या सापा विषयी माहिती दिली असता निखिल हा लागलीच घटनास्थळी पोहोचला.
निखिलने जवळपास तब्बल एक तास सर्च ऑपरेशन करून सापाचा शोध घेत काळ्या रंगाच्या या दुर्मिळ विषारी सापाला सर्पमित्र निखिल डाखोळे ने मोठ्या शिताफीने पकडले.व त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय,बुटीबोरी, खैरी येथे वनविभागाचे कर्मचारी मुंडे व चौव्हाण यांच्या स्वाधीन केले.
निखिल डाखोळे (सर्पमित्र टाकळघाट )
आपला एक फोन कॉल सापाचे प्राण वाचाऊ शकते.
साप या प्राण्या मध्ये विविध प्रकारच्या प्रजाती पाहायला मिळतात म्हणून आपणास कोणत्याही प्रकारचा लहान अथवा मोठा साप आढळल्यास तो विषारी आहे हे स्वतःच्या मनी निश्चित न करता व त्या सापाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता तात्काळ आपल्या परिसरातील सर्प मित्राची मदत घेऊन त्या सापाला जीवन दान द्यावे.सोशल मीडिया वर आपल्या परिसरातील अनेक सर्प मित्रांचे नम्बर दिले आहेत.