रूईखैरी चंद्रपुर ते नागपुर हायवे रोडवर अपघातात मृत्यु

बुट्टीबोरी :- अंतर्गत मौजा रूईखैरी चंद्रपुर ते नागपुर हायवे रोडवर दिनांक १४/०२/२०२३ चे ००.३० वा. ते ०१.३० वा. दरम्यान फिर्यादी नामे- दिनेश दत्तात्रय अलोने, वय ४८ वर्ष, रा. मंगळवारी पेठ उमरेड ह. मु

पाझरीटोल नाका नागपुर जि. नागपुर हे हायवे टोलनाका पाझरी येथे सुपरवायझर म्हणुन काम करतात हे रूइखैरी शिवारात चंद्रपुर ते नागपुर हायवे रोडवर टोल क २९६०० आर एच एस येथे पेट्रोलींग करीत असतांना

एक अनोळखी इसम पांढऱ्या रंगाचे फुलबाईचे लायनींग चेक शर्ट व सिंमेट रंगाचे फुल पॅन्ट घातलेला इसम मृतक नामे- श्रावण जिंदल कर्लुके, वय ४५ रा. रुईखैरी हा रोडवर पडून दिसल्याने खाली उतरून जावुन पाहीले असता त्या इसमाला डोक्याला व उजव्या पायाला जबर मार लागुन तो जागीच मरण पावला होता.

सदर व्यक्तीस कोणत्यातरी अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निश्काळजीपणे चालवुन पायदळ जात असलेल्या इसमास धडक दिल्याने जखमी करून त्याचे मरणास आरोपी कारणीभूत झाला.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरुन पो.स्टे.

बुट्टीबोरी येथे आरोपी चालकाविरुध्द कलम २७९, ३०४ अ भादवी सहकलम १८४ मोवाका कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू असुन गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रेजीवाड पोस्टे बुट्टीबोरी या करीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *