बुटीबोरी (दि. ३ डिसेंबर) : बुटीबोरी नगरपरिषदेत लीपक म्हणून कार्यरत असलेले सुभाष श्रीपदवार यांची सेवा निवृत्ती. बुटीबोरीतील ढोमणे सभागृह येथे साजरा करण्यात आली. या कार्यक्रमात अनेक मान्यवर तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
सुभाष श्रीपदवार यांनी आपल्या इतकया वर्षांच्या सेवा कालावधीत नगरपरिषदेसाठी उत्कृष्ट काम केले. त्यांनी नोंदणी विभाग, स्वच्छता व इतर शासकीय कार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे बुटीबोरी नगरपरिषदेला अनेक प्रशंसा मिळाल्या होत्या. श्रीपदवार यांच्या कामाची अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभात, सुभाष श्रीपदवार यांचा गौरव करण्यात आला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बुटीबोरी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी त्यांचे योगदान मान्य करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून बुटीबोरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुभाष श्रीपदवार यांनी आपल्या सेवेशी संबंधित काही आठवणी सांगितल्या आणि नगरपरिषदेच्या कामकाजावर आपले विचार मांडले.
त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर बुटीबोरी नगरपरिषदेमध्ये त्यांच्या योगदानाची उणीव जाणवणार आहे. मात्र, त्यांच्या कार्याची धडा घेत, आगामी पिढीला सेवा देण्याची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.