आश्रय मतिमंद मुलांची निवासी कर्मशाळा, बुटीबोरी द्वारे मतिमंद मुलांसाठी शैक्षणिक सत्रामध्ये सतत नवनवे उपक्रम राबविले जातात. मतिमंद विद्यार्थ्यांद्वारे निर्मित नवनवीन वस्तूंचे प्रदर्शनी लावली जाते. रक्षाबंधनाचे औचित्य साधून IIIT NAGPUR महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांद्वारे तयार करण्यात आलेल्या राखी ची प्रदर्शनी लावण्यात आली. IIIT NAGPUR चे रजिस्टार श्री. कैलाश डाखळे सरांच्या परवानगीने लावण्यात आलेल्या या प्रदर्शनीला
श्री. डाखळे सरांनी भेट देऊन मुलांचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांद्वारे निर्मित वस्तूंची खरेदी देखील केली आणि शिक्षकांना प्रोत्साहन दिले. IIIT NAGPUR चे प्राध्यापक डॉ. हर्ष गर्ग सर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच सर्व प्रोफेसर स्टाफ व तेथील विद्यार्थ्यांनी मतिमंद मुलांच्या कलागुणांची मनभरून स्तुती करत वस्तूंची खरेदी केली.
या उपक्रमास संस्थेचे संस्थापक सचिव श्री. रमेशजी भंडारी साहेबांचे मार्गदर्शन लाभले. आश्रय मतिमंद मुलांची निवासी कर्मशाळा, बुटीबोरीच्या व्यवस्थापकीय अधीक्षिका कु. भारती मानकर मॅडम, श्री योगेश प्रधान, रश्मी शेंडे, प्रीती पाटील, डंभारे मॅडम तसेच अविनाश तळवतकर व मुकेश साखरे सहभागी झाले. शाळा विभागाचे श्री. विशाल जुमडे, श्री. दिनेश बावणे व श्री निलेश पवनीकर यांचे विशेष सहकार्य लाभले.