
बुटीबोरी, छत्रपती शिवरायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊंची शिकवण, त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांचे विचार प्रत्येक भारतीयाला नेहमीच मार्गदर्शक ठरणारे आहे. असे प्रतिपादन पुनर्जन्म आश्रम, वृद्धाश्रमाचे संस्थापक प्रयाग डोंगरे यांनी केले.

बालाजी कॉन्व्हेंट माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, बुटीबोरी येथे आयोजीत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण भोयर तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक डॉ. गणेश बुटके प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्याध्यापक डॉ. बुटके यांनी माणूस कसा असावा आणि व्यक्तिमत्व कसे घडवावे, यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य भोयर यांनी स्वामी विवेकानंदाचे विचार व राजमाता जिजाऊंच्या संस्काराची आठवण करुन दिली.

यावेळी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजामा जिजाऊची भुमिका साकारून त्यांच्या विचारांची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली. सदर संयुक्त कार्यक्रम शाळेचे संचालक डॉ. प्रकाश नेऊलकर यांच्या मार्गदर्शनात पार पडला. याप्रसंगी शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.