बोथलीत एचआयव्ही आजारावर जनजागृती

मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयाचे आयोजन

बुटीबोरी, नजिकच्या बोथली ग्रामपंचायत अंतर्गत गोदावरीनगर स्थित अंगणवाडी केंद्रात सह्याद्री फाउंडेशनच्या सहकार्याने इंदिरा गांधी मनपा रुग्णालय गांधीनगर आयसीटीसी सेन्टर नागपूर तर्फे एचआयव्ही आजारावर जनजागृती कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्त तपासणी,

हिमोग्लोबिन, शुगर, थायराइड, एलएफटी, केएफटी तसेच लिपिड प्रोफाइल तपासण्या करण्यात आल्या. यात शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. यात 100 महिला तसेच पुरुषांच्या रक्त चाचण्या करून एचआयव्ही आजाराबाबत तज्ज्ञांकडून उच्च मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी आयसीटीसीच्या समुपदेशक भाग्यश्री रामटेककर,

महालॅबचे रवी शेंडे, रुपाली घायर, एलडब्लूएस नेहा कुकडे यांचेसह सह्याद्री फाउंडेशन, उपसरपंच अरुण वानखेडे, नितीन उमाटे, पोलिस पाटील, ग्रा.पं. सदस्य गणेश भरडे, ज्ञानेश्वरी बीजेवार, स्वाती पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अंगणवाडीसेविका विजयालक्ष्मी भेलावे यांच्या मार्गदर्शनाखाली भूमेश्वरी पटले, अंगणवाडीसेविका प्रमिला चिंचोलकर, मदतनिस आदींनी सहकार्य केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *