बोरखेडी (रेल्वे) येथे पक्षीगृह वितरित पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम
नागपूर/१६ मार्च:- तालुक्यातील बोरखेडी (रेल्वे) येथील पशुवैधकीय दवाखाना श्रेणी २ येथे एकात्मिक कृषी विकास कार्यक्रमांतर्गत नागपूर पंचायत समिती,पशुसंवर्धन विभागाकडून तलंग गटा करीता पक्षीगृह वाटप करण्यात आले.
अस्मानी,सुलतानी संकटामुळे सध्याघडीला शेती व्यवसाय डबघाईस आलेला आहे.अशावेळी शेतीला पूरक व जोडधंदा म्हणून पक्षीपालन हे सोयीचे होऊन यातून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील व पक्षी संवर्धन सुद्धा होईल.म्हणून पक्षीपालन व्यवसाय जोडधंदा म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन नागपूर पंचायत समिती उपसभापती संजय चीकटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना केले.
या पक्षीगृह वितरण कार्यक्रमाला बोरखेडी (रेल्वे)ग्रा प सदस्य देवकी इवनाते,नागपूर प स पशुसंवर्धन विभाग अधिकारी डॉ मांडेकर,डॉ हितेंद्र रहांगडाले,डॉ काकड,उत्पल डांगोरे,गुणवंत मंगरुळकर आदी उपस्थित होते.या कार्यक्रमात राजू नारायण ढोके,सीता अटक,जगदीश राजेंद्र घाटे,सागर मरसकोल्हे,संजय मरसकोल्हे आदी जणांना पक्षीगृह वितरित करण्यात आले.यावेळी उत्तम जीवने,बारइ,नंदू कुंभारे, हरीश फंड,कमलेश मुन व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.