butibori midc phase 2

नवीन बुटीबोरीत होणार पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स!

इंजिनिअर्स इंडिया लि. तर्फे जागेचे सर्वेक्षण : अहवाल चार महिन्यात

बुटीबोरी– केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नवी दिल्लीतील इंजिनिअर्स इंडिया लि.च्या (ईआयएल) दोन सदस्यीय चमूने पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणीसाठी एमआयडीसीच्या नवीन बुटीबोरी औद्योगिक परिसराची पाहणी केली. सर्वेक्षणाचा तांत्रिक- आर्थिक व्यवहार्यता अहवाल चार महिन्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स होणार वा नाही, यावर निर्णय होणार आहे. प्रकल्पाच्या उभारणीसाठी सरकारी वा खासगी यापैकी कोणती कंपनी पुढाकार घेते, ही बाबही प्रकल्पासाठी महत्त्वाची ठरणार आहे.


मिहान वा नागपूर जिल्ह्यातील औद्योगिक परिसरात रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स एकत्रित आणण्यासाठी ‘वेद’चे प्रदीप माहेश्वरी यांचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी ‘ईआयएल’च्या दोन अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणाने पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी जवळपास २५०० एअर जागा लागणार आहे.


पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सच्या मुद्यावर नागपुरात हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा यांच्याशी वेदच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली होती. या प्रकल्पासाठी तांत्रिक आर्थिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ‘ईआयएल’चे मुख्य महाव्यवस्थापक अनिल कुमार आणि वरिष्ठ व्यवस्थापक विनीत बक्षी या दोन अधिकाऱ्यांची चमू नागपुरात सर्वेक्षणासाठी आली. त्यांनी प्रकल्पात तयार होणारी उत्पादने, फिड स्टॉक, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडून (जेएनपीटी) येणारी पाइपलाइन, ऊर्जा व पाण्याचा स्रोत, जागेची गुणवत्ता आणि समृद्ध महामार्गाचा तपशील समजून घेतला. यावेळी अधिकाऱ्यांसह एमआयडीसी अधिकारी मेश्राम, वानखेडे, लोणकर आणि वेद कौन्सिलचे नवीन मालेवार आणि नारायण गुप्ता उपस्थित होते.

त्यानंतर ईआयएलच्या अधिकाऱ्यांनी उद्योग भवनात एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी आणि वेद कौन्सिलच्या अन्य पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रकल्पाच्या व्यवहार्यतेची चर्चा केली. यावेही एमआयडीसीचे विभागीय अधिकारी महेंद्र पटेल, हिंगण्याचे प्रमुख मेश्राम, रिलायन्स इंडस्ट्रीजचे माजी उपाध्यक्ष व पेट्रोकेमिकल विशेतज्ज्ञ विनायक मराठे, वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख, उपाध्यक्ष नारायण गुप्ता, सचिव राहुल उपगन्लावार, माजी अध्यक्ष शिवकुमार राव, कोषाध्यक्ष नवीन मालेवार, सदस्य राजीव अग्रवाल उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *