बुटीबोरी-महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय २ अंतर्गत कामगार कल्याण केंद्र बुटीबोरी येथे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन निमित्ताने कर्तुत्वान कामगारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता.
या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. मंदार वानखेडे सभापती पाणीपुरवठा समिती बुटीबोरी प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. देवेंद्र टेकाडे सामाजिक कार्यकर्ते तसेच मा. येजेंद्र सिंग ठाकूर कामगार नेते, मा. दिलीपजी रेवतकर ,कामगार नेते मा. सतीश सायंनकर सर माजी उपव्यवस्थापक इंडोरामा प्रायव्हेट लिमिटेड हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्तृत्ववान कामगारांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये मा. विजय महादेव डोंगे,मा. मोहम्मद शकिल अहमद ,मा.युगल किशोर पडोळे,मा. विरेशपाल चौधरी, मा.प्रशांत पुरुषोत्तम शेंडे यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रतिभाताई भाकरे यांनी केले . कार्यक्रमाचे संचालन व आभार बुटीबोरी केंद्राचे केंद्रप्रमुख सुधर्मा खोडे यांनी केले. सदर कार्यक्रमामध्ये परिसरातील कामगार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री. सुनील विश्वकर्मा, शरदभाऊ कबाडे, रीता कुटे, सुनील चव्हाण, सुरेश बेलसरे, मंदा वासनिक, दर्शन सोमकुवर ,सचिन रोडगे, अनिल जीवतोडे इत्यादींनी सहकार्य केले.