प्रेम त्रिकोणातून हत्या

बुटीबोरीतील थरार, 2 संशयीत ताब्यात

बुटीबोरी/नागपूर, क्राईम रिपोर्टर. प्रेम त्रिकोणातून एका ई- रिक्शा चालकाची गळा चिरून हत्या करण्यात आली. ही घटना रविवारी सकाळी बुटीबोरी पोलिस ठाण्यांतर्गत मोहगाव शिवारातील सेलिला लेआऊटमध्ये घडली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

संतोष मनोहर चुन्ने (47) रा. तकिया-धंतोली, असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष हा ई-रिक्शा चालवत होता. त्याचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते. रविवारी तो नेहमीप्रमाणे रिक्शा घेऊन बुटीबोरीकडे निघाला. त्याच्या मागे-मागे आरोपीही दुचाकीने निघाले. मोहगाव शिवारात संधी साधून आरोपींनी संतोषला अडविले. निर्जनस्थळी घेऊन जात सत्तूरने त्याचा गळा चिरला. रक्ताची धार लागली. संतोष खाली कोसळताच आरोपी फरार झाले. दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास एका गुराख्याला संतोषचा मृतदेह दिसला.

त्याने तत्काळ पोलिस पाटील सुधाकर वानखेडे यांना माहिती दिली. सूचना मिळताच बुटीबोरी पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृताची ओळख पटविण्यात आली. अज्ञात आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. दरम्यान आरोपी नागपूरचे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सायंकाळी दोघांना ताब्यात घेतले. आरोपींपैकी एक संतोषचे ज्या महिलेशी प्रेमसंबंध होते तिचा प्रियकर असल्याची माहिती मिळाली आहे.


reference by navrashtra

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *