karmayogi group phptp butibori news

कर्मयोगीची मकर संक्रांत गोरगरिबांच्या दारी.

कर्मयोगी फाऊंडेशन हे गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांच्या कृतिशील विचारसरणीतुन बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर कार्य करणारे सामाजिक संघटन आहे.


दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी त्यांनी माणसातली माणुसकी जपत मकर संक्रांतीचा सण बुटीबोरी परिसरातील भटक्या समाजातील, फुटपाथवर राहणाऱ्या तसेच बाहेर गावावरून कामासाठी आलेल्या व पालांची घरे करून राहणाऱ्या परिवारांचा शोध घेत त्यांच्याकडे जाऊन त्या ताईंना वाण देऊन तिळगुळ देत त्यांच तोंड गोळ करत, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवीत संक्रातीच सण साजरा करण्यात आला. तसेच लहान मुलांना बिस्किटचे वाटप करत सर्वाना फराळाचे देण्यात आले. यावेळी काम करून आलेल्या थकल्या भागल्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहण्याजोकता होता. आज पर्यंत आम्ही अनेक ठिकाणी कामाला जातो, परंतु कोणी अशाप्रकारे आमच्यासोबत कोणताही सण साजरा करत नाही. ते कार्य कर्मयोगी फाऊंडेशनने केले आहे, त्याबद्दल त्यांनी कर्मयोगी फाऊंडेशनचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवाराने यशस्वी मेहनत घेतली.butibori news midc

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *