टाकळघाट ग्रा.पं.च्या वॉर्डनिहाय आरक्षणाची सोडत

कित्येकांचा हिरमोड तर अनेकांना लागली लॉटरी

टाकळघाट येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या टाकळघाट ग्रामपंचायत निवडणुकीचे वार्ड निहाय सदस्यपदाची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली.
नागपूर जिल्ह्यातील सर्वात जास्त उत्पन्न देणारी ग्रा.पं. मधून टाकळघाट ग्रा.पं.चे नावलौकिक आहे. या ग्रा. पं मध्ये येत्या निवडणुकीत सरपंचपदाचे आरक्षण नामाप्र ( खुले)

आरक्षित असल्याने सरपंचपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान सरपंच शारदा शिंगारे प्रबळ दावेदार असून भाजपाकडून माजी जि प सदस्य हरिचंद्र अवचट यांच्या नावाची चर्चा सुरू आहे सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून होणार असल्याने अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व काही भाजपमध्ये असलेले अनेकजण पक्षाशी बंडखोरी करून सरपंचपदाची निवडणूक लढण्याचे चिन्ह दिसून येत असून त्यांचा छुप्या पद्धतीने जनतेचा कल घेणे सुरू आहे १७ सदस्य संख्या असलेल्या टाकळघाट ग्रामपंचायत मध्ये एकूण ६ वॉर्ड असून,

सदस्य म्हणून आरक्षण सोडत यादीत वॉर्ड क्र. १ मध्ये नामाप्र (महिला), सर्वसाधारण – ( महिला) सर्वसाधारण, वॉर्ड क्र. २ मध्ये अनुसूचित जमाती (महिला), सर्वसाधारण, वॉर्ड क्र. ३ मध्ये अनुसूचित जाती (महिला), नामाप्र, सर्वसाधारण (महिला), वॉर्ड क्र. ४ मध्ये अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण, वॉर्ड क्र. ५ मध्ये अनुसूचित जाती, नामाप्र, सर्वसाधारण (महिला) तर वॉर्ड क्र. ६ मध्ये नामाप्र (महिला), सर्वसाधारण, सर्वसाधारण असे आरक्षण आहे. याप्रसंगी सरपंच शारदा शिंगारे, उपसरपंच नरेश नरड, ग्रामविकास आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला असून, या आरक्षण सोडतीने अनेकांची लॉटरीही लागली आहे. तर अनेक दिग्गज आपल्या सौं च्या पदराआडून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी तयार झाले आहे. ज्यांचा हिरमोड झाला आहे त्यांना अजून पाच वर्ष थांबावे लागणार आहे अधिकारी जीवन देशमुख, माजी जि.प. सदस्य हरिचंद्र अवचट, ग्रा.पं. सदस्य उमेश कावळे, सदस्य सतीश कोल्हे, राजू बजाईत, विलास डायरे, ताराचंद बहादुरे, ठोमदेव कावळे, शिवाजी पोहाणे, योगेश डाखोळे, अनंता मोरवाल, बाबा डायरे, दिलीप डबूरकर, शुभम बलवीर, शुभम श्रीखंडे, चंदू कावळे, जितू वाटकर आदी उपस्थित होते

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *