
बुटीबोरी :- मागील दोन वर्षात कोरोणा परिस्थीती मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे नुकसान झाले आहे.ज्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मानसिक तणाव सोसावा लागत आहे.मागील दोन वर्षात उद्भवलेल्या समस्यामुळे पालक व शाळा यामध्ये एक दरी निर्माण झाली.परंतु या वर्षी नविन सत्रास प्रारंभ झाला.

त्यामुळे दुर्गम भागात असणाऱ्या शाळा,अंगणवाडी विषयी अध्यावत माहिती मिळविण्यासाठी व तेथील विध्यार्थी पालकाना उद्भवणाऱ्या समस्या जाणून घेण्याकरिता नागपूर ग्रामीण भागात असणाऱ्या अंगणवाडी व ग्रापंचायतला ला नागपूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या व तेथील विध्यार्थी व पालकांच्या समस्या जाणून घेतल्या.

नागपूर पंचायत समिती सभापती रेखाताई वरठी,उपसभापती संजय वंसतराव चिकटे,जी.प.स सदस्य वृन्दा नागपूरे,गट विकास अधिकारी भागवत मॅडम,गट शिक्षण अधिकारी घोडके मॅडम,परतेकी वि.अ.पंचायत,मडावी वि.अ.यांनी सोनेगाव बोरी,आलागोदी,दहेली,रामा,सोनेगाव(लोधी),येथिल शाळा अंगणवाडी व ग्रामपंचायतला भेटी दिल्या.या दरम्यान तेथील शिक्षक,पालक व नागरीकांचे समस्या जाणुन घेतल्या. व त्यावर कोणत्या उपाय योजना केल्या जाऊ शकतात यावर चर्चा करण्यात आली.यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन उपसभापती संजय चिकटे यांनी दिली.butibori
