स्कूल चले हम “शाळेची घंटा वाजली रे….
*बालाजी कॉन्व्हेन्ट प्रा.शाळेत विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत.
बुटीबोरी:– तब्बल दोन वर्षा पासून शैक्षणिक क्षेत्रात मुलांच्या अभ्यासाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.परंतु सत्र २०२२-२३ मध्ये पुन्हा एकदा नव्या उत्साहाने शाळेची घंटा वाजली आहे.विद्यार्थ्यानं मध्ये शाळे विषयी गोडी निर्माण व्हावी त्या अनुषंगाने शाळेच्या पहिल्या दिवशी बालाजी कॉन्व्हेन्ट प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्याप निखील साबळे सर यांच्या हस्ते आज विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.कार्यक्रमा प्रसंगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक निखिल साबळे,रोहन तावरे,नितीन वाटमोडे,तुषार सरोदे, हर्षा कातकडे,माधुरी केराम व नितीन कुरई सर प्रामुख्याने उपस्थित होते.
लहान मुलांच्या मनात शाळेविषयीचा उत्साह पाहायला मिळाला.शाळेचा पहिला दिवस चिमुकल्याना खूप आनंद देणारा असतो.पंधरा दिवसाच्या अगोदर पासूनच मुले शाळेची तयारी सुरु करतात.बुक-पुस्तके नवीन गणवेश,जेवनाचा डब्बा,पाठीवरचे दप्तर इत्यादी साहित्य खरेदी करून लहान मुले शाळेसाठी तयार होत असतात.नवनवीन पुस्तकांना कव्हर लावून त्यामधील चित्रे बघण्याची तळमळ त्यांच्या मनी जाणवत असते.
शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद व्यक्त करताना लहान लहान चिमुकल्यांनी “शाळेची घंटा वाजली रे “असा नाद करत विद्यार्थ्यानी बालाजी शाळेत प्रवेश केला.
शाळेमधील माझा पहिला दिवस कसा असणार ? माझी नवीन मित्र-मैत्रिणी कोण असणार ? नवीन शिक्षिका बद्दलचे अनेक विचार मनात तरंगत असतात.रडता रडता शाळेत जाणे मध्यंतराची घंटा वाजता मित्राबरोबर आईने दिलेल्या डब्यातील अन्नाची चव चाखून बघणे यांची हुरहू.र त्यांना सकाळपासूनच मुलांच्या मनात लागलेली होती.
शाळेच्या पहिल्या दिवशी या चिमुकल्यांच्या मनात भीतीपोटी सुद्धा कही प्रश्न यांच्या मनात निर्माण झाले आहेत.जसे माझे नवीन शिक्षक माझ्यावर रागावतील काय? माझे नवीन मित्रमंडळी चांगले मिळतील ना?मला माझ्या मैत्रिणीसोबत बसायला मिळेल ना?अश्या असंख्य प्रश्नांची कोडी विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली असल्याचे दिसून आले.
वर्ग जरी लहान असला तरी मुलांच्या पाठीवरचे ओझे मात्र कमी होत नाही.मुलांच्या हसऱ्या दिसणाऱ्या चेहऱ्यावर अभ्यासाचा तानाने आपली वेगळीच छाप सोडलेली आहे. शाळेतून घरी परतल्यावर शाळेतील गृहपाठ करणे,आईने दिलेला गृहपाठ करणे की शिकवणी वर्गाचा गृहपाठ करने यातच मन बेचित्त होऊन जाते.
ओझे विना अध्ययन ही संकल्पना जारी शासनाने माडली असली तरी मुलांच्या दप्तरांचे वजन मात्र कमी झाले नाही.त्यामुळे या छोट्याशा पाठीवर अभ्यासाचा इतका मोठा भार दिसून येत आहे. विध्यार्थी घरी पोहचताच आई माझ्या छोट्याशा पाठीवर अभ्यासाचा किती मोठा भार असे उद्गार बाहेर पडतात.
बालपण हिरावून गेलं की फक्त आठवणीच उरतात म्हणून या लहानपणा ला हवे तितके जपा कारण कागदाचे नाव तयार करून पाण्यात तरंगवण्याची मजा मोठे झाल्यावर येत नसते शिल्लक राहतात त्या फक्त आठवणीच म्हणून या चिमुकल्यान बरोबर कधीतरी लहान होऊन जगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे.