जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : नुकसानीची केली पाहणी, ग्रामस्थांशी साधला संवाद
Butibori–पुनर्वसन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी प्रशासनाला दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी जुनापाणी येथे पूरस्थितीची पाहणी करीत ग्रामस्थांशी संवाद साधला.
१५ जुलै रोजी तलावाचा बांध फुटल्याने मंगरूळ ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले जुणापानी गाव बुडाले होते. तलावाचे पाणी गावातील १६ घरात शिरल्याने अन्न-धान्याचे मोठे नुकसान झाले. तसेच ग्रामस्थांचे १८१ पाळीव जनावरे पुरात वाहून गेले होते. याशिवाय १३ हेक्टर शेती पाण्याखाली आली होती.
ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना गावाचे पुनर्वसन करून देण्याची विनंती बुधवारी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. यासोबतच तलावाच्या फटलेल्या बांधाचे बांधकाम लवकर करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
याप्रसंगी आ. टेकचंद सावरकर, तहसीलदार आशिष वानखेडे, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत, मंडळ अधिकारी सुधाकर राठोड, तलाठी अल्का मुळक, ग्रामसेवक व्यंकटेश निस्ताने, उपसरपंच गजानन भगत आदी उपस्थित होते.