बुटीबोरी येथील महाकाली महिला फाउंडेशनने स्वातंत्र्य दिनानिमित्त एक भव्य कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात ध्वजारोहण, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. सुखदेव सिंग डेप्युटी कमांडन (BSF) मांडवा आणि प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. राजेंद्र चिखलखुदे साहेब मुख्य अधिकारी बुटीबोरी, मा. श्री.आकाश दादा वानखेडे उपाध्यक्ष भाजपा, मा. जिवनजी घिमे, पदाधिकारी बी.एम.ए. आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महाकाली महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. रिता कुटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले की, ते महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवत असून येत्या काळात महिला उद्योजक मेळावा आयोजित करण्याचे नियोजन आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मा. श्री. जीवनजी घिमे, डायरेक्टर साईट्रॉन कंपनी, मा. अविनाशभाऊ गुजर माजी उपाध्यक्ष नगर परिषद बुटीबोरी, श्री मुन्ना भाऊ जयस्वाल, मा. अमजद भाऊ शेख यांचा सत्कार करण्यात आला. यासोबतच 50 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन बाजवा मॅडम आणि आभार वैशाली धोपटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद कबाडे , नवनीत तिवारी सर, बँक मॅनेजर आणि महाकाली महिला फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे सहकार्य लाभले.