विपरीत परिस्थितीत ‘हर्ष’ने घेतली गरूडझेप

सातगावच्या जिगरबाज तरुणाची आर्मीमध्ये निवड

बुटीबोरी, ता.01: चांगल्या परिस्थितीत जवळ येणारे लोक वाईट परिस्थितीत पळ काढतात. परंतु परिस्थिती कशीही असो जिदीच्या बळावर खंबीर राहून परिस्थितीवर करण्याचे कौशल्य सातगाव (दुधाळा) येथील हर्ष लीलाधर चापले या तरुणाने सिद्ध करून दाखविले व संघर्षातून यश संपादन केले.जिगरबाज तरुणाची आममध्ये निवड झाल्याने त्याच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बुटीबोरीनजिक असलेल्या सातगाव (दुधाळा) येथील हर्ष लीलाधर चापले यांनी प्राथमिक शिक्षण जि.प. शाळेमधून पूर्ण केले. बालपणीच हर्षच्या वडिलांचे निधन झाले. परिवाराची संपूर्ण जबाबदारी त्याच्या आईवर आली. घरी एक मोठा भाऊ आणि तो सुद्धा थोड्या प्रमाणात मानसिक आजाराने ग्रस्त आहे.

अश्या परिस्थितीमध्ये आईने वाटेल ती कामे करून हपंचा सांभाळ केला. दवाखान्यातील मिळेल ते काम करायची तिथून घरी आल्यावर दुसन्यांच्या घरची भांडी धुनी करून मुलांचा सांभाळ केला. मुलाला चांगले शिक्षण घेता यावे म्हणून परिस्थितीशी दोन हात सुद्धा केले. हर्ष अभ्यासासोबत खेळामध्ये निपुण होता.

आईने आपल्या शिक्षणाकरिता स्वतःच्या जिवाची झिज करून कशा प्रकारे आपले संगोपन केले, आईने बघितलेले सर्व स्वप्न पूर्ण करण्याकरिता जीव पणाला लाऊन मेहनत करण्याचा निर्धार हर्षने बारावी संपताच केला.

पुस्तक आणि मैदान या दोषांना आपले मित्र बनवून यांच्या सोबतच तो वेळ घालवू लागला.सतत दिवस-रात्र तो लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करत होता. शासनाच्या ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत इंडियन आर्मीमध्ये भरती झाली असता स्वतःला सिद्ध करण्याची हर्षला एक संधी मिळाली. या संधीचे हर्षने सोने केले.

२०२२ गत वर्षीच हा योग घडून आला. भरतीमध्ये रनिंगनंतर, मेडिकल पूर्ण करून हर्षला रात्री २ वाजता लेखीपेपर करिता बोलवण्यात आले. यामध्ये सुद्धा हर्षने यादीमध्ये स्वतःचे नाव बघून हर्ष व त्याच्या आईचा

आनंद पाहण्यासारखा होता. २९ डिसेंबरपासून आर.टी. हैदराबाद येथे सहा महिन्याची ट्रेनिंग यांनी दिली. या उंच भरारीचे श्रेय हर्षने आपल्या आई व मित्र परिवाराला दिले.

बालाजी कॉन्व्हेन्टमध्ये | हर्षचा सत्कार

बुटीबोरीमधील नामांकित बालाजी कॉन्व्हेन्टमध्ये २६ डिसेंबर रोजी शाळेचे संचालक डॉ. प्रकाश नेऊलकर यांनी हर्ष चापलेचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पुढील वाटचालीकरीता त्याला अनेक शुभेच्छा दिल्या. शालेय विद्यार्थ्याची प्रगती बघून आई वडीलांसोबतच शिक्षकांची सुद्धा मान गवान उंचावते असे वक्तव्य शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण भोयर व गणेश बुटके यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण बुटीबोरीमधील नामांकित बालाजी कॉन्व्हेन्टमध्ये २६ डिसेंबर रोजी शाळेचे संचालक डॉ. प्रकाश नेऊलकर यांनी हर्ष चापलेचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पुढील वाटचालीकरीता त्याला अनेक शुभेच्छा दिल्या. शालेय विद्यार्थ्याची प्रगती बघून आई वडीलांसोबतच शिक्षकांची सुद्धा मान गवान उंचावते असे वक्तव्य शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण भोयर व गणेश बुटके यांनी व्यक्त केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण भोयर, गणेश बुटके व धनिराम घरत व मित्र अशोक नागपुरे उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *