भव्य महाप्रसाद, हवन व सुंदरकांडचे आयोजन
बुटीबोरी : बुटीबोरी येथे २ फेब्रुवारी २०२५ रोजी श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा हजारो राम भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. मंदिराच्या पवित्र भूमीवर पूजा-अर्चा केली करण्यात आली. आयोजक बुटीबोरी श्रीराम मंदिर निर्माण समिती द्वारा भुमी पूजना नंतर विशेष होम हवन श्रीराम सुंदरकांड व भव्य महाप्रसादाचे करण्यात आले आहे.

छत्तीसगढ राजनंदगाव येथील श्रीराम जस गायक आकाश व अभिषेक यांच्या सुमधुर अमृतवानिने उपस्थितास मंत्रमुग्ध केले. या भव्य सोहळ्यास हिंगणा विधानसभा क्षेत्रातील आमदार समीर मेघे यांनी सुद्धा हजेरी लावली.

स्थानीक विश्वस्त श्रीराम भक्तांनी या कार्यक्रमाची जोरदार तयारी केली असता संपूर्ण बुटीबोरी परिसर भगवामय करण्यात आला तर जगोजागी रामजीचे फलक झळकत असताना दिसून येत होते. मंदिराच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर श्रद्धाळूनी सहभाग नोंदवला.

बुटीबोरी राम मंदिराच्या उभारणीसाठी या भूमिपूजनाला महत्त्वपूर्ण मानले जात आहे आणि भक्तगणांच्या शुभेच्छा व प्रार्थनांनी आजचा हा दिवस अतिशय अतिशय प्रसन्नतेचा ठरला. प्रत्येक नागरिकामध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण दिसून आले. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी बुटीबोरीतील परिसर सज्ज झाला.
भूमिपूजनानंतर भव्य महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली ज्यामध्ये हजारोच्या संख्येत श्रीराम भक्तांनी प्रसाद ग्रहण करून श्री राम चा आशीर्वाद घेतला. हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. अत्यंत आयोजक श्रीराम मंदिर निर्माण समिती तर्फे उपस्थित सर्व भक्तांचे आभार व्यक्त केले.