
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमा
अंतर्गत बालाजी कॉन्व्हेन्ट मधील १२०० विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी
बुटीबोरी :- प्रगत देशाचा कणा म्हणजे सुदृढ बालक होय. 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालक निरोगी असावा या माध्यमातून आर.बी.एस.के. (राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम) रार्वत्र राबविल्या जात आहे. याच माध्यमातून बालाजी कॉन्व्हेन्ट शाळेत जवळपास 1200 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

आज दिनांक 12 ऑक्टोंबरला वर्ग 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी डॉ. रोहित मेहता, डॉ. नीलजा पापळकर, ए.एन.एम. सारिका डांगाले व प्रविना पांडे यांनी तब्बल 1200 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. प्रत्येक बालकांचे स्वस्थ आरोग्य व सुदृढ शरीर असणे गरजेचे आहे या करिता राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. निःशुल्क हेल्थ चेकअपला सकाळी 10 वाजताच्या सुमारास सुरुवात झाली असता बालाजी कॉन्व्हेन्ट मधील संपूर्ण विध्यार्थी या आरोग्य तपासणी करीता उपस्थित होते. डॉ. रोहित मेहता, डॉ. नीलजा पापळकर, यांनी बालकांमध्ये मध्ये असणारे विकार पडताळून त्यावर योग्य उपाय योजना सुचविल्या तसेच त्यांना आवश्यक असणारी औषधी सुद्धा देण्यात आली.

बालकाची शारीरिक अवयवाची पडताळणी करून बालकांनी सकस आहार घेऊन दररोजच्या आहारात रुग्णांनी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश अधिक प्रमाणात करण्याचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी शाळेतील मुख्याध्यापिका जयश्री टाले, मुख्याध्यापक निखिल साबळे, माधुरी राम, हर्षा कातकडे, नितीन वाटमोडे, वैभव खोब्रागडे, रोहन तावरे व नितीन कुरई सर उपस्थित होते.