पाच दिवसात पडल्या बेड्या; रुईखैरी येथून दुचाकी चोरी, उमरेडातून अटक
बुटीबोरी, वार्ताहर. डोक्यात गुन्हेगारी शैतान का घर’ असी एक म्हण समाजात आहे. आजची पिढी सोशल मीडियावर फावल्या वेळी नको त्या उचापती करण्याचे माध्यम शोधत असतात. असाच एक प्रकार एका युवकाने केल्याचा उघडकीस आला. युट्यूबच्या माध्यमातून दुचाकी कशी चोरतात याचे प्रशिक्षण घेतले. तसा त्याने प्रयत्नही केला आणि यशस्वी देखील झाला. मात्र त्याचे हे गुन्हेगारी जगात शिरकाव करण्याचे पहिले पाऊल पोलिसांनी आपल्या कर्तबगारीने अवघ्या पाच दिवसातच हुडकून काढले. बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुईखैरी येथील शुभम नानाजी वाघमारे (24) याने नेहमीप्रमाणे (दि.25 जुलै) रोजी सांयकाळी 6 वाजताचे सुमारास कामावरून परत आल्यानंतर आपली मोटर सायकल एमएच 40/ सीएन 6035 ही घरा समोर हॅन्डल लॉक करूण ठेवली होती. सकाळी उठल्यावर त्याला ती दिसून आली नाही.
इतरत्र चौकशी केली आणि शोध घेतला. मात्र मोटर
सायकलचा कुठेही थांग लागला नाही आपली मोटर सायकल चोरी झाल्याचा त्याला दाट संशय आल्याने बुटीबोरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 303 (2) बी. एन. एस च्या गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपीच्या शोधकामी लागले. परिसरातील सीसीटीवी कॅमेरे चाचपले आणि आपल्या खबऱ्यांच्या माध्यमाची आरोपीस जेरबंद करण्याची मोहीम आखली. दरम्यान त्यांना खबर मिळाली की, जिल्ह्यातील उमरेड येथील बालाजी नगर येथे एक व्यक्ती ही मोटर सायकल वापरत आहे.
खबर मिळताच ठाण्यातील पोलिस हवालदार प्रवीण देव्हारे आणि पोशी गौरव मोकळे यांनी कसलाही वेळ न दवडता उमरेड येथे रवाना होऊन सापळा रचला. खबरेवरून मिळालेल्या वर्णनावरून सुरेश मडावी (25) रा. रूईखैरी ता.जि. नागपूर ह.मु. बालाजी नगर गिरडे यांच्या घरी किरायाणे उमरेड जि. नागपूर याला ताब्यात घेतले. पोलिसांनी सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली. मात्र त्याने सुरवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. या उत्तरावरून पोलिसांचा संशय बळावला. मग त्यांनी खाक्या दाखवताच मोटर सायकल चोरीची कबुली दिली. गुन्हेगारी जगातले त्याचे हे पहिले पाऊल त्याने सोशल मीडियावरील युट्यूबच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन चोरी केल्याचे सांगितले. सांगितले. ही कारवाई वरिष्ठ अधिकारी तसेच ठाणेदार हृदयनारायण यादव यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत लभाणे यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार प्रवीण देव्हारे पोलिस शिपाई गौरव मोकळे यांनी कामगिरी पार पाडली.