बुटीबोरी वीर सावरकरनगर, केईसी कॉलनीत राहणाऱ्या बारा वर्षीय मुलाला ‘जीबी सिंड्रोम‘ थी लक्षणे आढळून आल्याने त्याला नागपूर येथे उपचारार्थ दखल करण्यात आले आहे. हा नागपूर ग्रामीण तालुक्यातील पहिला रुग्ण आहे.
शुकवारी दिवसभर दिनचर्या सुरू असताना रात्री ताप, सदी-खोकला नव्हता.

कुठलाही आजार नसताना शनिवारी सकाळी शाळेत जाण्याकरिता उठला असता त्याला पलंगाखाली उतरता येत नव्हते, कंबरेपासून पाय उचलता येत नव्हते, त्याला काय झाले, हे पालकांना कळत नव्हते, मुक्ताई हॉस्पिटलचे डॉ. दीपक सिंग बायस यांना त्यांनी घरी येण्याची विनंती केली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलाचे पाय कंबरेपासून दिले पडल्याचे दिसले. पायांना रिप्लेक्स नव्हते.

डॉक्टरांना त्याला ‘जीबी सिंड्रोम’ हा आजार असल्याचा संशय आला. त्यांनी हॉस्पिटलला आणून प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपूर येथील निरो सर्जन डॉ. विवेक अग्रवाल यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले. रात्रीपर्यंत त्याची लक्षणे वाढत गेली. त्याच्यावर उपचार सुरू आहे.

डॉक्टर बायस यांनी सांगितले की, हा व्हायरल आजार असून पूर्णपणे बरा होतो. घाबरून जाऊ नये, आवाहन केले. मसल पेन, कंबरेपासून पाय ढिले पडणे, पायांना मुंग्या येणे, बोलण्यास त्रास होणे, अन्न गिळायला त्रास होणे यापैकी कुठली लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, हातपाय स्वच्छ धुणे, बाथरूम, मुलाचे खेळणे, घराचा सरफेस, इंटेरियर स्वच्छ ठेवणे, व्यायाम करणे, इम्युनिटी वाढविण्याचे आवाहन केले.