भूखंडाचे वाटप, महिलांमध्ये आनंदाचे वातावरण; शेकडो महिलांना मिळणार रोजगार
नागपूर: ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम मिळावे, असा उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन प्रवर्तक सुधीर बागडे यांनी बुटीबोरी औदयोगिक वसाहतीतील अनेक महिलाना एकत्र सोबत घेत उद्योग उभारणार आहेत. यासाठी बुटीबोरीत अपराल क्लस्टर उभारण्यात येणार आहे. या क्लस्टरला राज्यस्तरीय सर्वोच समितीने मंजुरी दिली आहे. भूखंडाचे वाटपही करण्यात आले आहे
. क्लस्टर झोपडपट्टीतील महिलांच्या घराजवळच आहे. हे क्लस्टर उभे राहिल्यानंतर शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. बुटीबोरी बेसिक अपरल क्लस्टर फाउंडेशन साठी हे कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारन्यात येणार आहे. ऑगस्ट २०२४ ला एम आई डी सी ने बुटीबोरी बेसिक अपरल क्लस्टर ला भूखंड क्रमांक पी-९३ से वाटप केले आहे. प्लॉटचा ताबा फॉउंडेशनला मिळाल्यानंतर कॉमन फॅसिलिटी सेंटर साठी बांधकामचा श्रीगणेशा होणार आहे. त्यानंतर क्लस्टरचा तिसरा टप्पा लवकरच सुरु होईल. जनतेचा विकास व्हावा, हे उदिष्ट डोळ्यासमोर ठेऊन २०१६ यावर्षी बाबासाहेब आंबेडकर सोशल इनोव्हेशन कौन्सील (बेसिक) अरुणकुमार खोब्रागडे आणि सुधीर बागडे यांनी ‘नॉन फॉर प्रॉफिट’ कंपनी सुरु केली.
सातगाव, कान्हाळगाव, रिधोरा आणि जवळपासच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या दलित महिलांना जोडून बुटीबोरी येथे बेसिकने हा पहिला प्रकल्प सुरु केला होता, तेव्हा प्राथमिक मूल्यांकणात असे आढळून आले की, बहुतेक महिलांना शिलाई मशीनसह काम करणे सोईचे होते. परिणामी, बेसिक परिधान उत्पादनभोवती एक परिसंस्था निर्माण करण्यावर काम करेल, असा निर्णय घेण्यात आला. प्रशिक्षनाची आखणी करण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर दोनशे महिलांना प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात आले. तेव्हा सुमारे शंभर कुशल महिला सूक्ष्म उदोजक म्हणून तयार होत्या. १२ ते १५ महिन्यात उत्पादन सुरु करण्याची मान्यता आहे.
बुटीबोरीला वस्त्र निर्यात क्षेत्र बनविण्याचे स्वप्न
महाराष्ट्र सरकार एसएमई क्षेत्राच्या क्षमता वाढविण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रमाचा प्रचार करत होते. कौन्सीलने क्लस्टर कार्यक्रमासाठी सूक्ष्म उपक्रमचा समावेश करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला. क्लस्टरच्या गरजेनुसार बुटीबोरी बेसिक अपरल क्लस्टर फाउंडेशन ७५ सूक्ष्म उद्योजकांना एसपीव्ही मध्ये भागधारक म्हणून समाविष्ट करून स्थापना केली. क्लस्टर कार्यक्रमासाठी जिल्हा उद्योग केंद्र नागपूरकडे अर्ज केला.
आता त्याला मान्यता मिळाली आहे. कपड्यामध्यें राष्ट्रीय बैंड विकसित करणे आणि बुटीबोरीला महाराष्ट्रतील सर्वात मोठे वस्त्र निर्यात क्षेत्र बनविणे हे फाउंडेशनचे स्वप्न आहे. फॉर्मल सूट, जॅकेट्स तसेच शेरवानी, जोधपूरी इत्यादीचे उत्पादन करणार आहे
उद्योजक घडून निर्यात करण्याची शक्यता
गारर्मेन्ट्स प्रकल्प उभे राहिल्यानंतर जिल्ह्यातील बाजारपेठेत वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे सहज उपलब्ध होतील. तसेच हे क्लस्टर उभे राहिल्यानंतर जिल्ह्याबाहेर, परदेशात कपडे निर्यात होऊन अनेक महिला उद्योजक घडतील. हा प्रकल्प राज्यात व देशात पथदर्शी ठरू शकतो असे प्रवर्तक सुधीर बागडे म्हणाले