गणपती विसर्जनाला गेला अन् वेणा नदीत बुडाला

तुरकमारी भारकस येथील घटना

बुटीबोरी-मित्राच्या घरी सातगाव येथे गणपती विसर्जनाला गेलेल्या ४४ वर्षीय व्यक्तीचा वेणा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना तुरकमारी भारकस परिसरात गुरुवारी (२८ सप्टेंबर) सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली.

रामेश्वर हरी हटवार (४४, रा. वॉर्ड नं. पाच, काचोरे ले-आउट, बुटीबोरी), असे मृतकाचे नाव आहे. रामेश्वर हे आपला मित्र पुरुषोत्तम काळे, रा. सातगाव यांच्या घरी बुधवारी (२७ सप्टेंबर) महाप्रसादासाठी आले होते. दुसऱ्या दिवशी अर्थात २८ सप्टेंबरला गणपतीचे विसर्जन होते. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सुरकमारी भारकस येथे नदीत विसर्जन करीत असताना रामेश्वर यांना खोल पाण्याचा अंदाज आला नाही. यात ते खोल पाण्यात बुडाले. खूप वेळ झाला तरी ते बाहेर न आल्याने इतर सर्व चिंता लागली होती.

ही माहिती पोलीस ठाणे बोरी यांना देण्यात आली. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भोयर आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन नदी परिसरात शोधाशोध केली. दिवरबांधवांच्या मदतीने दोन तास खोल पाण्यात त्यांचा शोध घेण्यात आला. रामेश्वर मृतावस्थेत आढळले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. पुढील तपास बुटीबोरी पोलीस करीत आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *