
बुटीबोरी नगरपरिषदेच्या प्रांगणात नगराध्यक्ष बबलू गौतम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश वानखेडे, उपाध्यक्ष अविनाश गुर्जर, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे,

शिक्षण सभापती विनोद लोहकरे, आरोग्य सभापती मुन्ना जयस्वाल, महिला व बालकल्याण सभापती संध्या आंबटकर, पाणीपुरवठा सभापती मंदार वानखेडे, नगरसेवक सनी चव्हाण,

नगरसेवक बबलू सरफराज, नगरसेवक संकेत दीक्षित आदी उपस्थित होते. याप्रसंगी ‘स्वच्छ बुटीबोरी, सुंदर बुटीबोरी’ या स्पर्धेतील विजेत्यांना नगराध्यक्ष बबलू गौतम, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

