बुटीबोरीत वाहतुकीचा जीवघेणा खोळंबा

मोकाट जनावरांच्या कोण आवळणार मुसक्या?
चंद्रपूर, वर्धा महामार्गावर जनावरांचा ठिय्या

बुटीबोरी: नागपूर ते चंद्रपूर व वर्धा येथे जाणाऱ्या महामागांवर बुटीबोरी मध्यवर्ती ठिकाण आहे; परंतु शहरात वाहनांनी प्रवेश करताच जागोजागी जनावरांचा ठिय्या नित्याचा झाला आहे. त्यामुळे अनेकदा अपघात झाले. शहराच्या मुख्य चौकात तर कळपाने जनावरे असतात. हा प्रकार जीवघेणा आहे. या मोकाट जनावरांच्या मुसक्या कोण आवळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकाराने वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत.

या मार्गावर मागील काळात अनेक अपघात झाले आहेत. बहुतांशी अपघात हे मोकाट जनाकांमुळे झाले आहे. मोकाट जनावरांना पकडणे, मालकांचा शोध घेण्याची मोहीम संबंधित विभागाने हाती घेतल्याचे आठवत नाही, त्यामुळे या मोकाट जनावरांचे बाली कोण? असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारू लागले आहेत.

रस्त्यांवरील मोकाट जनावरांमुळे वाहनधारक तर सोडा, सामान्य माणूससुद्धा उरुत झाला आहे. वस्तुतः मोकाट जनावरांसाठी केंद्र व राज्य शासनाने कायदे केले आहेत. त्याकरिता प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज आहे. तरीही शहरातील या स्थितीवरून ती कुचकामी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. महामार्ग तर सोडा, शहरातील विविध रस्त्यांवर ठिकठिकाणी जनावरांचा ठिव्या पाहायला मिळते. त्याचा नागरिकांना खूप जास होत आहे. मोकाट जनावरे रस्त्यावर आडवे आल्याने अनेक अपघात झाल्याच्या घटना पडल्या आहेत. नुकताच महामार्गावरील जिजामाता हायस्कूलसमोर मोकाटजनावरांमुळे चारचाकी वाहनाचा भीषण अपघात होताना टळला, जीवितहानी झाली नाही; परंतु या घटनेत एक दुचाकीस्वार जखमी झाल्याची माहिती आहे. यावायत टोल व्यवस्थापकाशी चर्चा केली असता उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने आगमन सावजी ते शनी मंदिरापर्यतच्या मार्गावरीलसुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी संबंधित

उड्डाणपुलाचे कंत्राटदार कंपनी टीएनटीकडे आहे. मात्र त्यांचेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. या मोकाट जनावरांमुळे एखादा मोठा अपघात होऊन बळी गेल्यावर प्रशासन जागे होईल का, असा प्रश्न आहे.

बुटीबोरी शहरात नाही कोंडवाडा

मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोडवावात टाकणे जनावरांच्या मालकांकडून दंड वसूल करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेने मोकाट जनावरांवर अंकुश लावला जाऊ शकतो, मोकाट जनावरांच्या मालकांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने तसेच जनावरांना पकडल्यास त्यांना ठेवण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत आहे, अशा तकारी नागरिकांच्या आहेत.

बुटीबोरी आणि परिसरातील विशेषकरून राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरांचा अक्षरशः हैदोस आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकाला नको इतका त्रास सहन करावालागत आहे. – मुजीब पठाण, काँग्रेस नेते, बुटीबोरी

बुटीबोरी महामागांला लागून दोन शाळा आहेत. या शाळेमध्ये पाच हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळा सुटली की विद्याव्यांची गर्दी होते. अशा मोकाट जनावरांमुळे सायकल चालविणे अवघड झाले आहे. उपाययोजनेची नितांत गरज आहे. – गौरव हजारी, सामाजिक कार्यकर्ता, बुटीबोरी

या परिसरात मोकाट जनावरे फिरत असतात. पाऊस आला की ते पोलीस ठाण्याजवळच्या ओव्हरब्रिजखाली ठिय्या मांडतात. त्यामुळे चालकांना गाडी चालविणे कठीण झाले आहे. या जनावरांचा संबंधित प्रशासनाने बंदोबस्त करावा. – राजू गावंडे, सामाजिक कार्यकर्ता, बुटीबोरी

महामार्गावर मौकाट जनावरे तसेच बुटीबोरी मुख्य मार्गावर जनावरांचा नेहमी कळप दिसून येत आहे. नगरपालिका प्रशासनाकडून अनेक कारवाया केल्या जातात. कोडवाडा नसल्याने त्रास होत आहे. जनावरांचे मालक त्यांना बिनधास्त मोकाट सोडतात. नगरपरिषद प्रशासन अशांवर पुन्हा कारवाई करणार आहे. राजेंद्र चिकलकुंदे, सीओ व प्रशासक, नगरपरिषद बुटीबोरी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *