बुटीबोरी :- अंतर्गत ०५ कि.मी. अंतरावरील मौजा संकेत ज्वेलर्स बुटीबोरी येथे दिनांक ०८/०६/२०२१ ते – दिनांक २३/०३/२०२२ चे १३.३० वा. दरम्यान फिर्यादी नामे- विजय मधुकरराव हिरूळकर, वय ४८ वर्ष, रा. वर्धमान नगर, मारोती नगर वार्ड क्र. ०३ बुटीबोरी ता. जि. नागपूर हे सोनार दुकानातील मॅनेजर यांनी पोस्टेला ०१/५/२२ रोजी तकर दिली कि, यातील आरोपी यांनी दि ०८/०६/२०२१ ते २३ / ०३ / २०२२ पर्यंत अश्या वेगवेगळया तारखेला नमुद आरोपीतांनी फिर्यादी याचे मालकाचे दुकानात नकली दागीने गहान ठेवून त्याची २,०२,०००/- रू फसवणुक केली.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरुन पो.स्टे. बोरी येथे आरोपीविरुध्द कलम ४२० भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस बुटीबोरी करत आहे।