बुटीबोरी: गावविकासासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करीत आहोत. यात जनतेचा सहभाग असणे आवश्यक असल्याचे मत नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी व्यक्त केले. स्थानिक नगरपरिषद कार्यालयात १८ एप्रिलला वर्धापनदिन पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष बबलू गौतम तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष अविनाश गुर्जर, सभापती विनोद लोहकरे, मुन्ना जयस्वाल, मंदार वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे, तुषार डेरकर,
नगरसेवक सन्नी चव्हाण, बालकल्याण सभापती संध्या आंबटकर, मनोज ढोके, बबलू सरफराज, संकेत दीक्षित संतोष भोयर, राऊत गुरुजी, अभियंता विलास बोरकर उपस्थित होते. मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.
आयोजनासाठी नेहा पोतले, आनंद नागपुरे, प्रफुल्ल टेंबरे, ममता दाते, पिंटू खडककर, मुक्तार अली, धीरज चौधरी, स्नेहा वरभे, मिलिंद पाटील, विशाल दुधे, धनराज सातपैसे, प्रशांत सातपैसे, धीरज चौधरी, चहदि विरू भदोरिया यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाला नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याधिकारी राजेंद्र चिकलखुदे तर संचालन ममता दाते यांनी केले. आभार नेहा पोचले यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुद यांनी केले होते.