आश्रय कर्मचाऱ्यातील मतिमंद विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम
हिंदू धर्माचे आराध्य दैवत व बुद्धीची देवता असलेल्या श्री गणेशाचे संपूर्ण महाराष्ट्रभर अगदी थाटामाटात आगमन होत असताना बुटीबोरी स्थित आश्रय मतिमंद मुला मुलींची निवासी कर्मशाळा येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने पर्यावरण पूरक श्री गणेशाची मूर्ती साकारलेली आहे.
आश्रय कर्मशाळेमध्ये दिव्यांग मुलांसाठी अगदी वर्षभर नवनवीन उपक्रम राबविले जातात. यातच एक हा स्तुत्य उपक्रम येथील शिक्षकांनी मतिमंद विद्यार्थ्यांकडून करून घेतला.
मतिमंद विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात आलेली श्री गणेशाची मूर्ती शुद्ध काळया माती पासून तयार करण्यात आलेली असून मूर्ती अतिशय सुबक व देखणी आहे.
मतिमंद विद्यार्थ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती तयार करण्यासाठी जवळपास एक आठवडा एवढा वेळ लागला असून या मूर्ती करिता कुठल्याही प्रकारचे हानिकारक रंग तथा प्लास्टर ऑफ पॅरिस चा वापर करण्यात आलेला नाही.
संस्थेचे संस्थापक सचिव श्री रमेश भंडारी साहेब यांच्या मार्गदर्शनातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये आश्रय कर्मशाळेच्या व्यवस्थापकीय अधीक्षिका कु. भारती मानकर मॅडम यांचा खारीचा वाटा आहे. मतिमंद विद्यार्थी पांडुरंग लोहकपुरे, अनिकेत नाईक, रोशन बारंगे, तुषार लांडगे यांनी
श्री गणेशाची मूर्ती तयार केली असून शिक्षक वृंद योगेश प्रधान, रश्मी शेंडे, प्रीती पाटील, लक्ष्मीकांत पाटील, कांचन डंभारे तसेच अविनाश तळवतकर, गजू राऊत, सुरेश काकपुरे मुकेश साखरे सहभागी झाले. शाळा विभागातील विशाल जुमडे, दिनेश बावणे, निलेश पवनीकर यांनी सहकार्य केले.