शेकडो वारकरी भक्त आपल्या दिंडी सह सप्ताहात सहभागी..
बुटीबोरी :- शनिवारला बुटीबोरी जुनी वसाहत मधील पुरातन मुरलीधर स्वामी देवस्थानमध्ये अखंड हरिनाम सप्ताह उत्सवाचे समापन करण्यात आले. १९१५ साली वेना नदीच्या तीरावर वसलेल्या या प्राचीन मुरलीधर स्वामी मंदिर येथे आज १०९ वे दिंडीचे वर्ष पूर्ण करण्यात आले. राधा कृष्णाच्या वेशभूषा करून नटलेल्या लहान-मोठ्या बालगोपालसह अनेक भक्तांनी मुरलीधर स्वामी देवस्थानात हजेरी लावली.
१० ऑगस्टला या हरिनाम सप्त्याहला सुरुवात झाली. समापन दिनी दिंड्या मधील भक्तांचा उत्साह पाहण्या सारखा होता. सकाळ पासूनच बँडपथक व भजन मंडळाच्या टाळाचा गजर संपूर्ण बुटीबोरी परिसरात दुमदुमत होता. दूर गावा वरून आलेले असंख्य वरकरी आपल्या दिंडीसह या सप्त्याह मधे सहभागी झाले व भक्तांनी श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. देवस्थानातील सेवाभावी भक्तांनी सांगितले की अगदी लहान पणापासून आम्ही या दींड्यान मध्ये सहभागी होत आहो. १९७९ मधील आलेला महापुर सुद्धा या मंदिरावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पाडू शकला नाही.
अनेक प्रसंग, व इतरत्र अडचणी या मंदिरावर येतानी बघितल्या परंतु सर्व प्रसंगानुरूप हा हरिनाम सप्ताह आजपर्यंत कोणत्याही कारणास्तव खंडित झाला नाही. बुटीबोरी मधील पुरातन मंदिरात नित्य नियमाने अखंडित सप्ताह अशाच प्रकारे निरंतर चालू राहावा अशी सर्वांची मनापासून इच्छा आहे. हजारोच्या संख्येने बुटीबोरीवासी एकजूट होऊन या कार्यक्रमाचे दरवर्षी नित्यनियमाने आयोजन करतात. भव्य महाप्रसाद व काल्याचा प्रसादाचे वाटप करण्यात आले.