दारूच्या नशेत वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

बुटीबोरी-एका वृद्धाने दारूच्या नशेत नॉयलॉन दोरीच्या सहाय्याने पळसाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुटीबोरी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या म्हाडा वसाहतील गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. उमाजी पुंडलिक मोवाळे (५८), रा. म्हाडा वसाहत, बुटीबोरी असे मृतकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार फिर्यादी मयूर उमाजी मोवाळे (२६) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मृतक फिर्यादीचे वडील असून, मृताकाने दारूच्या नशेत म्हाडा वसाहतीतील पळसाच्या झाडाला जुन्या नॉयलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावला.

आज सकाळी उमाजी यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच बुटीबोरी पोलिस त्वरित घटनास्थळी पोहचले व मृतदेह झाडावरून खाली उतरविला. यावेळी मृतकाच्या तोंडातून दारू पिल्याचा वास येत होता. यावरून मृतकाने दारूच्या नशेत गळफास लावला असावा, असा पोलिसांना संशय आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *