बुटीबोरी: दिवाळीची चाहूल लागताच सर्वत्र प्रसन्नतेची लाट उसळत असल्याची दिसून येते या शुभ प्रसंगाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या अंगी असणा या कला गुणांना वाव मिळावा या उद्देशातून दिनांक 20 ऑक्टोंबर गुरुवारला बालाजी कॉन्व्हेन्ट शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दिवाळीचा सण दीपावली नावाने सुद्धा ओळखला जातो. हा सण इतर सणांपेक्षा वेगळा आहे. या सणात आकाशातले तारे पृथ्वीवर येतात अशी कवी कल्पना आहे. या आनंदाच्या सणाचे महत्व चिमुकल्यांना पटवून सांगण्यासाठी बालाजी कॉन्व्हेन्ट मध्ये दीपोत्सव’ सोहळा साजरा करण्यात आला. विद्याथ्यांमध्ये दिवाळी सुांचा आनंद त्यांच्या मनात द्विगुणीत होतअसतो त्या अनुषंगाने बालाजी कॉन्व्हेंट मध्ये दिवाळीनिमित्त शालेय स्तरावर वर्ग 1 ते 12 वी मधील विद्यार्थ्यानं करीता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी आकाशदिवा तयार करणे, शुभेच्छा पत्रे बनविणे आणि दिया डेकोरेशन हार तोरण तयार करणे, थाली सजावट, मेहंदी स्पर्धा, भाषण स्पर्धा, पाककला, गीत गायन स्पर्धेमध्ये चिमुकले रंगून गेलेले दिसले. तर काही बच्चेकंपनी रांगोळी काढण्यात आणि त्यात रंग भरण्यात मग्न दिसले. रंगीबेरंगी पोशाखामध्ये आलेली चिमुकले आणि त्यांचा उत्साह बघून या दीपोत्सवाला आकाशातील तारे पृथ्वीवर आल्याचा भास होत होता. वर्ग 1 ते 12 वी मधील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या दिवाळी स्पर्धेमध्ये भाग घेतला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या साहित्याची पडताळणी शाळेतील मुख्याध्यापक जयश्री टाले व निखिल साबळे, गणेश बुटके, प्रवीण भोयर सर व शाळेतील शिक्षकांच्या सहकार्याने करण्यात आली. उत्तम कला कृती करणा या विद्यार्थ्यांना त्यांना प्रथम, द्वितीय क्रमांक देण्यात आले. डॉ. प्रकाश शाळेचे संचालक नेउलकर यांनी या दिवाळी स्पर्धेत सहभागी सर्व विध्यायांची कौतुक करून दिवाळी स्पर्धेचे अतिशय चांगल्या रीतीने आयोजन केल्या बद्दल विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.