५५ हजार कोटी रुपये खर्चाची शक्यता : लवकरच करार
नागपूर : विदर्भात प्रस्तावित पेट्रोलियम कॉम्प्लेक्ससाठी आवश्यक असलेल्या जागेचा शोध अखेर पूर्ण झाला आहे. बुटीबोरी येथील एमआयडीसीची जागा या प्रकल्पासाठी ‘बेस्ट’ ठरली आहे. वीज, पाणी आणि समृद्धी महामार्ग जवळ असल्याने बुटीबोरीला प्राधान्य मिळाले आहे.
बुटीबोरीसोबतच कुही आणि चंद्रपूर जिल्हाही या स्पर्धेत सहभागी होते.पेट्रोलियम कॉम्प्लेक्ससाठी नियुक्त नोडल एजन्सी एमआयडीसीच्या विनंतीवर केंद्र सरकारची कंपनी इंजिनिअर्स इंडिया लि.ने काही दिवसांपूर्वी बुटीबोरी येथील ठराविक जागेचा सर्व्हे केला होता. पेट्रोलियम तज्ज्ञ
विनायक मराठे यांनी सर्व्हेमध्ये
बुटीबोरीला उपयुक्त असल्याचे सांगितले. आता टर्म ऑफ रेफरेंस’ निश्चित करून सविस्तर ‘फिजिबिलिटी रिपोर्ट’ (व्यवहार्यता अहवाल) तयार करण्याचा करार केला जाईल. विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काऊंसिल (वेद) चे अध्यक्ष देवेंद्र पारेख यांनी सांगितले की, हा प्रकल्प एकूण ५५ हजार कोटीचा राहण्याची शक्यता आहे.
गॅस आधारित असावा प्रकल्प
पेट्रोलियम कॉम्प्लेक्सचे तज्ज्ञ प्रदीप माहेश्वरी यांनी सांगितले की, नागपुरातील प्रकल्प हा गॅस आधारित असावा. मुंबईवरुन नागपूरपर्यंत नॅचरल गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. गेल (गॅस अँथोरिटी सहकार्याने हे काम होऊ शकते. असाच एक प्रकल्प उत्तर प्रदेशातील ओरैया येथे