आदर्श ग्राम ब्राम्हणीसह परिसराला दूषित पाण्याचा विळखा ; प्रदूषण नियमांना केराची टोपली, आरोग्याचा प्रश्न गंभीर
बुटीबोरी, वार्ताहर, एकीकडे स्थानिक औद्योगिक क्षेत्रामुळे बुटीबोरी शहरातील दूषित पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोच दुसरीकडे शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर उभारलेल्या फेज 2 म्हणून स्थापित झालेल्या अतिरिक्त एमआयडीसीमुळे लगतच्या आदर्श ग्राम ब्राम्हणी तसेच इतर गावांना दूषित पाण्याचा विळखा बसला असल्याचे चित्र असून काही संशयीत कंपन्या बेजबाबदारपणे नाल्यावाटे रासायनिक पाणी सोडत आहेत. ज्यामुळे नाल्यातील जलजीव मृत्युमुखी पडल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले आहे. त्यामुळे ब्राम्हणी गावातील नागरिकांनी तीव संताप व्यक्त करत आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. ब्राम्हणी ग्रामपंचायतने याचे गांभीर्य लक्षात घेऊन नाल्यावाटे दूषित पाणी सोडणाऱ्या संशयीत कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे जवळपास 30 ते 32 वर्षांपूर्वी बुटीबोरी शहरालगत आशिया खंडातील सर्वांत मोठे उद्योग क्षेत्र म्हणून उदयास आले. कालांतराने येथील काही उद्योजकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या जिवासी खेळ सुरू केला.
जी वेना नदी बुटीबोरी शहर तसेच परिसरातील इतर गावांसाठी प्रमुख शहर म्हणून ओळख होती. तिला येथील काही कारखानदारांनी रासायनिक पाणी सोडून दूषित केले. यासाठी बुटीबोरी शहरातील अनेकांनी आंदोलने देखील केले हा इतिहास आहे. एकीकडे हा प्रश्न सुटत नाही तोच अवध्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्राम्हणी गावाच्या लगत उभ्या करण्यात आलेल्या फेज 2 नामक अतिरिक्त एमआयडीसीतील काही संशयीत उद्योजकांनी प्रदूषण नियमांना केराची टोपली दाखवून आपली परंपरा कायम ठेवल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. संशयीत कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणीः ब्राम्हणी शिवरातून जो नाला वाहतो जो थेट वेना धरणाला जाऊन मिळतो. त्याच नाल्यात आपल्या कारखाण्यातील रसायन मिश्रित पाणी सोडून त्याला अक्षरशः दूषित केले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न आ वासून उभा राहिला तर आहेच. शिवाय या नाल्यातील जलजीव मृत पावले असल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा गंभीर असल्याने ब्राम्हणी ग्रामपंचायतीने संबधीत विभागांना दूषित पाणी सोडणाऱ्या संशयीत कंपन्यांवर कठोर कारवाः करण्याची मागणी केली आहे. कारवाई झाल्यास या कंपन्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून आगामी निवडणुकांवर देखील बहिष्का टाकणार असे नागरिकांनी सांगितले. प्रदूषण विभागाने घेतले पाण्याचे नमुनेःदूषित पाण्यामुळे उद्भवत असलेल्य समस्येमुळे वारंवार होत असलेल्य तक्रारीवरून प्रदूषण विभागाने दखल घेर त्यांचे नुकतेच एक पथक परिसरात दाखल झाले होते. त्यांनी नाल्यातील पाण्याचे नमुने घेत तपासणीसाठी पाठवले आहेत. य पाण्याच्या अहवालात काय नमूद केल्य जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आम्ही पाण्याचे नमुने घेतले आहेत त्याचा अहवाल देण्यासाठी कमीत कमी 8 ते 10 दिवस लागतील. दोषींवर नक्कीच कारवाई करण्यात येईल. – सुशील राठोड, अधिकारी, उप प्रादेशिक प्रदूषण विभाग