“माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत बुटीबोरीत सायकल रॅलीचे आयोजन”

बुटीबोरी: १४ फेब्रुवारी २०२५ रोजी नगर परिषद बुटीबोरीत माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत एक मोठी सायकल रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीचे आयोजन बालाजी कॉन्व्हेन्टच्या सहकार्याने करण्यात आले होते.

रॅलीचे मुख्य उद्दिष्ट प्रदूषणाचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांना गाड्यांच्या वापराऐवजी सायकल व ई-व्हेईकल्सचा वापर करण्याची प्रेरणा देणे होते. या रॅलीला नगर परिषद बुटीबोरीचे मा. मुख्याधिकारी श्री. राजेंद्र चीखलखुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूवात झाली.

बालाजी कॉन्व्हेन्ट बुटीबोरीचे मुख्याध्यापक श्री. प्रवीण भोयर सर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, शिक्षक आणि नगर परिषद कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

या उपक्रमामध्ये स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि प्रदूषण नियंत्रणासंदर्भात जागरूकता निर्माण केली.

नगर परिषद बुटीबोरीने ह्या उपक्रमाद्वारे प्रदूषण नियंत्रणाची महत्त्वपूर्ण बाब समजून नागरिकांमध्ये पर्यावरणस्नेही सवयी जागृत केल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *