कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव

शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याचे आवाहन

नागपूर कपाशीवर गुलाबी
बोंडअळीचा प्रादुर्भाव सध्यस्थितीत १० ते २० टक्के आढळून आला आहे. म्हणून ज्या शेतकयांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली आहे, त्यांनी पिकांचे निरीक्षण करून वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे यानी केले आहे.

कपाशीचे पीक ५० ते ६० दिवसांचे किंवा त्यापेक्षा जास्त मोठे झाल्यावर कपाशीला फूल लागण्यास सुरुवात होते. त्यावेळी गुलाबी बोंडअळी फुलांच्या खालच्या बाजूला एकेरी अंडी घालते. त्यातून दोन ते तीन दिवसात सूक्ष्म अळ्या बाहेर येऊन फुलांमध्ये प्रवेश करतात व उमलणाऱ्या पाकळ्या आतून तोंडातील वाग्याच्या सहाय्याने बंद करून जळी फुलामध्ये उपजीविका करते.

या फुलाला ‘डोमकळी’ म्हणतात. फुलाच्या आतील भाग अळीने खाल्ल्यामुळे बहुदा फुलांचे रूपांतर बोंडामधे होत नाही व ते गळून पडतात आणि फुलाचे रूपांतर बोंडामध्ये झाल्यास अळी बोंडामध्ये शिरून बोंड पोखरते. त्यावर नत्र खते व संजीविकांचा शिफारशीप्रमाणे वापर करावा. पीक उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसानंतर फेरोमेन सापळयाचा वापर करावा, यासाठी एकरी दोन आणि हेक्टरी पाच फेरोमैन सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावे तसेच मास टॅपिंगकरिता हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे वापरावेत.

पीक उगवणीनंतर ३५ ते ४० दिवसापासून दर पंधरा दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅडिरेक्टिन ३००० पीपीएम (४० मिलीप्रति ) १० ली पाणी याप्रमाणे फवारणी करावी. पीक उगवणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी १२ ते १५ दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा टॉयडीयाबॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस परोपजिवी मित्र कीटकाची १.५ लक्ष अंडी प्रति हेक्टरी चार वेळा सोडावे. फुलामध्ये प्रादुर्भाव ५ टक्केपर्यंत आढळून आल्यास क्विनॉलफॉस २५ टक्के (एएफ २५ मिली) किंवा क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही (२५ मिली) १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. प्रादुर्भाव ५ ते १० टक्के आढळून आल्यास क्विनॉलफॉस २५ टक्के ( एएफ २५ मिली) किंवा क्लोरपायरीफॉस २५ टक्के प्रवाही (२५ मिली) किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के (३० मिली) किया इंडोक्साकार्य १५.८ टक्के (१० मिली) या पैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. १० टक्केच्या वर प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी आवश्यकते नुसार किटकनाशकाच्या मिश्रणापैकी कोणतेही एका मिश्रण १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. क्लोरट्रानिलीप्रोल ९.३ टक्क लॅन्डासायहॅलोबीन ४.६ टक्के (५ मिली) किंवा क्लोरपायरीफॉस ५० टक्के सायपरमेथ्रीन ५ टक्के (२० मिली) किंवा कार्य १४.५ टक्के अॅसीटमिप्रीड ७.७ टक्के (१० मिली)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *