बुटीबोरी : बोथली ग्रामपंचायतीचे उपसरपंच अरुण वानखेडे यांच्या पुढाकाराने महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमात महिलांना प्रश्न, उखाणे विचारून बोलते करण्यात आले. सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा व संगीत खुर्ची स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना पैठणी देऊन गौरव करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद हॉस्पिटलच्या डॉ. साखरकर, २०२१च्या मिसेस इंडिया पुरस्कार विजेत्या रश्मी तिरपुडे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अंजली कानफाडे, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या उषा उपस्थित होते.

संचालन प्रतीक्षा सोमकुंवर यांनी केले. प्रास्ताविक सरपंच कविता नामुर्ते यांनी केले, तर आभार अनिता गवई यांनी मानले. आयोजनासाठी उपसरपंच अरुण वानखेडे, सागर ठाकरे, जियालाल बीजेतार, रजनी हांडे, स्वाती पाटील, तृप्ती सूर्यवंशी, ज्ञानेश्वरी बीजेवार, सुषमा ठाकरे यांनी सहकार्य केले.