स्वतः केली अंगणवाडीची स्वच्छता

■ टाकळघाट ग्रा.पं. सदस्याचा पुढाकार ग्रामसेवक व सफाई कर्मचाऱ्याचे दुर्लक्ष

टाकळघाट स्थानिक वॉर्ड क्र. ४ मध्ये असलेल्या अंगणवाडीत पावसामुळे मोठमोठेतण (कचरा) उगविला होता. पावसाचे दिवस असल्यामुळे कचऱ्यामध्ये साप, विचू यासारखे विषारी प्राणी लपून राहून अंगणवाडीतील लहान बालकांना त्यामुळे धोका होऊ शकतो, ही बाब हेरून टाकळघाट ग्रा. पं. चे सदस्य चंद्रशेखर हरिभाऊ कावळे यांनी काल शनिवार स्वतः सर्व तण, गवत व कचरा काढून अंगणवाडीची स्वच्छता केली.


या कचऱ्याची विल्हेवाट लवकरात लवकर लागवी म्हणून त्यांनी ग्रामपंचायतचे सचिव व स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांना जवळपास १५ दिवसांपूर्वी सूचना दिल्या होत्या. परंतु सूचना देऊन १५ दिवस उलटून गेलेतरीना सचिव, नास्वच्छता कर्मचारी यांनी रानी अंगणवाडी स्वच्छतेकडे लक्ष दिले. यामुळे ग्रा.पं. सदस्रु कावळे यांनी आपल्या दोन सहकारी दिगंबर कटरे व महादेव डायरे यांना सोबत घेऊन शनिवार दि १३ जुलै ला अंगणवाडीची स्वच्छता केली. अंगणवाडी मध्ये वयोगट ३ ते ६ वर्षाचे मूल येतात. याठिकाणी मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे झुले व खेळणे आहेत. परंतु तो सर्व परिसर गवताने व कचऱ्याने व्याप्त असल्याने तिथे विचू. साप यासारखे विषारी जीव राहू शकतात. जर खेळताना एखाद्या लहानशा चिमुकल्याला विंचू, साप चावून त्याचा बळी गेला असता त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आली असती का? किंवा त्या बालकाच्या मृत्युला जवाबदार कोण? असा प्रश्नही कावळे यांनी उपस्थित केला.

कर्मचाऱ्यांची मनमानी, सचिवाचे दुर्लक्ष

टाकळघाट ग्रा. पं. मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार असून याकडे सचिवाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप ग्रा. पं. सदस्य चंद्रशेखर कावळे यांनी प्रतिनिधीरी बोलताना केला. कर्मचारी दिवसभर ग्रामपंचायत कार्यालयात खुर्च्छा तोडत बसला असतो, तरी सचिव साहेब त्यांना साधा जाब विचारात नाही. स्वतः ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितलेल्या समस्यांचे निराकरण होत नाही तर सामान्य जनतेच्या समस्या खरंच सुटतील का? असा प्रश्नही कावळे यांनी उपस्थित केला

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *