मोहगाव: महाकाली महिला फाउंडेशन आणि एस. सी.जी. कॅन्सर सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तुलसीरामजी गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पॉलीटेक्निकल मोहगाव येथे आयोजित कॅन्सर तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन डॉ. कमलजीत कौर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तुलसीरामजी गायकवाड पाटील कॉलेजचे मुख्याध्यापक डॉ. पी. एल. नागतोडे, डॉ. नितीन काकडे, डॉ. सोनम आणि महाकाली महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. रिता दिनेश कुटे उपस्थित होते.
डॉ. नागतोडे यांनी आपल्या प्रास्ताविकात महिलांसाठी काम करणाऱ्या महाकाली महिला फाउंडेशनचे कौतुक करत त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवले. तसेच कॅन्सरचे दुष्परिणाम आणि पूर्व निदानाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
शिबिरामध्ये सुमारे 200 विद्यार्थ्यांची कॅन्सर तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली सांगोळे यांनी केले आणि आभार प्रदर्शन खुशाल भाऊ कोरेकर यांनी मानले.
या कार्यक्रमाला हिना कच्छला, अमोल बर्डे, नीरज कोरे, विपिन मुळे, बरखा मॅडम, हिमानी सोम, स्नेहा भांगे, अश्विनी पिसे, कीर्ती चंदेल, रीना तुमसरे, रुची साखरे, सुमन राम, सुवर्णा चौधरी, विजय तडोळेकर, दिनेश कुटे, सिटी इंडिया न्यूजचे संपादक शरद भाऊ कबाडे, सुनील विश्वकर्मा आणि महाकाली महिला फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.