butibori midc phase 2

अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रामुळे विदर्भाला बूस्टर डोस

१३९२ हेक्टरमध्ये पायाभूत सुविधा : आठ कंपन्यांना जागांचे वितरण

बुटीबोरी औद्योगिक वसाहतीपासून केवळ आठ ते नऊ किमी अंतरावर १३९२ हेक्टरमध्ये उभारण्यात आलेली अतिरिक्त बुटीबोरी आद्योगिक वसाहत आधुनिक सोईसुविधांनी परिपूर्ण आहे. सध्या आठ मोठ्या कंपन्यांनी १४३ हेक्टर जागेवर प्लॉट विकत घेतले आहे. कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाल्यानंतर स्थानिकांसह वैदर्भीय युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन विदर्भाचा निश्चितच विकास होणार आहे

नवीन वसाहतीत उद्योगांसाठी ८८१.२७ हेक्टर जागा उपलब्ध असल्यामुळे लहानांसह मोठ्या उद्योजकांना उद्योग उभारणी करता येईल. याकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) या क्षेत्रात येण्याचे उद्योजकांना आवाहन केले आहे. या वसाहतीत नवीन उद्योजकांना नव्याने उद्योग उभारणीची संधी मिळेल.

वसाहतीत ‘प्लग व प्ले’ योजना लवकरच


राज्य सरकारने प्लग अण्ड प्ले’ अर्थात उद्योगांचे नववर्ष’ ही योजना आणली आहे. ही योजना या नवीन औद्योगिक क्षेत्रासाठी लवकरच लागू होणार आहे. याअंतर्गत २०० हेक्टर जागा राखीव असून विविध मॉडेल राहील. पहिल्या टप्प्यात ५० युनिट राहतील. या अंतर्गत एमआयडीसी उद्योगांसाठी शेड उभारून त्यामध्ये वीज, पाणी आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देईल. उद्योगांना केवळ मशीनरी आणून उत्पादन सुरु करायचे आहे, अशी ही योजना आहे. भूखंड भाडेपट्ट्यावर व हप्ताबंद पद्धतीने तसेच उद्योजकांकरिता तयार बांधीव शेड भाडेपट्ट्यावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. – राजेश झंझाड, मुख्य अभियंता, एमआयडीसी नागपूर विभाग

औद्योगिक वसाहतीतील सुविधा पाणी, वीज, गॅस पुरवठा, पर्यावरण मंजुरी, सीईटीपी, फायर स्टेशन, रेल्वे स्टेशन, रेल्वे सायडिंग, युनिटी डक्ट, सौंदर्यीकरण व लॅण्डस्केपिंग, ६ किमीवर ड्रायपोर्ट आणि बुटीबोरी येथे हॉटेल्स, हॉस्पिटल, इंजिनिअरिंग व मेडिकल कॉलेज, शैक्षणिक संस्था, तांत्रिक शैक्षणिक संस्था, सार्वजनिक वाहतूक, मिनी मॉल, बगीचे,

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *