इंडियन पेट्रोल पंपासमोरील घटना
बुटीबोरी : एमआयडीसी : मार्गावरील इंडियन ऑइल पेट्रोलपंपासमोर ट्रकचालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (४ मार्च) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली
माहितीनुसार, मृतक धर्मेंद्र शंकर पासवान (४०, रा. बिहार, हमु. टाकळघाट एमआयडीसी) येथील तपाडिया कंपनीमध्ये कामाला होता. ३ मार्चला रात्रीची ड्युटी आटोपून सकाळी आठ वाजता घरी आला. दरम्यान, काही कामानिमित्त नुकत्याच नव्या घेतलेल्या पल्सर दुचाकी क्रमांक एन एस १२५ ने इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरून जात होता. यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक डब्ल्यूबी / २५ एल ०७८७ च्या चालकाने ट्रक डिझेल भरण्याकरिता वळताना मागेपुढे न पाहता दुचाकीस्वाराला धडक दिली.
यात दुचाकीचालक धर्मेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक वाहन घेऊन पसार झाला आहे. फिर्यादी आकाश अरविंद शेंडे यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम २७९, ३०४ अ व महाराष्ट्र मोटर वाहन कायद्यानुसार १८४, १३४, ७७ नुसार गुन्हा नोंदविला आहे.
पसार ट्रकचालकाचा शोध सुरू आहे. तपास ठाणेदार भीमाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात पीएसआय आरती उघडे करीत आहेत.butibori news today