निजी अस्पतालों को बुटीबोरी एमआईडीसी

बुटीबोरीत नवीन उद्योगांची गुंतवणूक

पंचतारांकित बुटीबोरी औद्योगिक वसाहतीसाठी नवे वर्ष नव्या उमेदीचे राहणार आहे. येत्या वर्षभरात येथे लक्षणीय गुंतवणूक होत आहे. इंडोरामासारखी जुनी कंपनी विस्तार करत आहे

पंचतारांकित बुटीबोरी औद्योगिक वसाहतीसाठी नवे वर्ष नव्या उमेदीचे राहणार आहे. येत्या वर्षभरात येथे लक्षणीय गुंतवणूक होत आहे. इंडोरामासारखी जुनी कंपनी विस्तार करत आहे. त्याचवेळी प्लास्टो, क्राफ्ट्समन, रुलॉन या नव्या कंपन्या येणार आहेत. रवलीन खुराणा यांची फार्मास्युटिकल कंपनीदेखील येथे प्रकल्प सुरू करणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होऊन औद्योगिकरणाला चालना मिळेल असा विश्वास आहे . बुटीबोरीत नवीन उद्योगांची गुंतवणूक

आशियातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या बुटीबोरीत नवे उद्योग प्रकल्प यावेत यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना बळ म्हणून इंडोरामा सुमारे सहाशे कोटींची गुंतवणुकीच्या माध्यमातून प्रकल्प विस्तार करत आहे. इंडोरामा सिंथेटिक्स इंडिया लिमिटेड हा विदर्भातील सर्वांत मोठा प्रकल्प आहे. पॉलिस्टर धागे व पॉलिमरचे उत्पादन करणारी ही कंपनी दिल्लीच्या ओमप्रकाश लोहिया यांची आहे. १९९३ साली इंडोरामा विदर्भात आली. १९९६मध्ये व्यावसायिक उत्पादन सुरू केले.  दरम्यानच्या काळात कंपनीने प्रकल्पाचा विस्तार केला. पार्शिअली ओरिएंटेड यार्न (पीओवाय), पॉलिस्टर स्टेपल फायबर (पीएसएफ), फुल्ली ड्रॉन यार्न (एफडीवाय), ड्रॉ टेक्स्चराइज्ड यार्न (डीटीवाय) अशी कृत्रिम धाग्यांची मालिका पूर्ण केली. आता ही कंपनी नव्या क्षेत्रात पाऊल टाकत प्लास्टिकच्या बॉटल बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे उत्पादन करणार आहे. त्यासाठी तब्बल सहाशे कोटींची गुंतवणूक होणार आहे. यासोबतच प्लास्टो कंपनी २५० कोटींच्या गुंतवणुकीतून सॉल्व्हंट प्लाण्ट लावणार आहे. रवलीन खुराणा फार्मास्युटिकल क्षेत्रात वीस कोटींची गुंतवणूक करणार आहे.बुटीबोरीत नवीन उद्योगांची गुंतवणूक

नवीन वसाहतीला बळ

बुटीबोरीची विस्तारित औद्योगिक वसाहत नवीन बुटीबोरी नावाने प्रसिद्ध आहे. येथे इंडियन ऑइलच्या डेपोशिवाय इतर कंपन्या येण्यास तयार नव्हत्या. सत्तर ते ऐंशी लाख रुपये एकर किंमतीमुळे विदर्भातील मध्यम तसेच लघुद्योजकदेखील जागा घेताना विचार करायचे. मात्र, आता या नवीन वसाहतीला चांगले दिवस आल्याचे चित्र आहे. येथे क्राफ्ट्समन ऑटोमेशन ही कंपनी २५ एकर परिसरात २५० कोटींचा प्रकल्प सुरू करणार आहे. रुलॉन ही ३५० कोटींची गुंतवणूक करून प्लास्टिकच्या उत्पादनांची निर्मिती करणार आहे.

नव्या कंपन्यांनी येण्यास उत्सुकता दाखवावी, आशा बळावी आणि नंतर मात्र विविध कारणांनी प्रकल्प रखडावे, हा बुटीबोरी एमआयडीसी आणि मिहानचा पूर्वानुभव आहे. काही प्रकल्प रडत-रखडत पूर्ण झाले आहेत. योगगुरू बाबा रामदेव यांचा मिहानमधील पतंजली फूडपार्क ३१ डिसेंबरला सुरू करण्याची घोषणा होती. हे आश्वासन पाळले न गेल्याचे अगदी ताजे उदाहरण आहे. या नवीन वर्षात बुटीबोरी वा मिहानच्या वाट्याला अशी दिरंगाई येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Source maharashtra time’s

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *