बुटीबोरी पोलिस हद्दीच्या वारंगा येथील घटना
घटनेबाबत संशय,सखोल चौकशीची नातेवाईकांची मागणी
बुटीबोरी -ले आउटच्या गार्डन चे बांधकाम सुरू असतांना कामास अडथळा निर्माण करणाऱ्या बोरवेलच्या केबलला बांबूच्या साहाय्याने बाजूला करतेवेळी लागलेल्या विद्युत करंटमूळे इसमाचा मृत्यू झाला.ही घटना बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हदीतील वारंगा येथील असून छबिलाल बळीराम बहेकार (४०) रा.उसिखेडा,ता.सडक (अर्जुनी),
जिल्हा गोंदिया असे या घटनेत मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असून त्यांचा हा अपघात की घातपात असी शंका नातेवाईकांडून व्यक्त केली जात आहे.त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी असी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार घटना असी की नंदकिशोर कावळे (३८) राहणार महालगाव,ता.साकोली जिल्हा भंडारा हे मृतक छबिलाल चे सोयरे असून त्यांनी बुटीबोरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तोंडी तक्रारीवरून मृतक हे सिव्हिल कामगार होते.अंदाजे एक ते दीड महिन्यांपूर्वी ते वारंगा येथील एका ले आउटच्या गार्डन चे बांधकाम करण्यास मनुष्यबळ पुरविणाऱ्या कुंभरे नामक कंत्राटदारांच्या बोलावण्यावरून आले होते.दि.९ जानेवारी रोजी छबिलाल यांच्या पत्नीने नंदकिशोर यांना फोन करून छबिलाल यांचा दुपारी चार ते साडेचार वाजता करंट लागून मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह हा नागपूर येथील शासकीय रुग्णालयात नेला असल्याची माहिती दिली.घटनेची माहिती नंदकिशोर यांना मिळताच त्यांनी काही नातेवाईकांसोबत नागपूर येथील शासकीय रुग्णालय गाठून बघितले असता त्या ठिकाणी छबिलाल यांचा मृतदेह हा सायंकाळी ७ च्या दरम्यान कुंभरे यांनी आणला असी माहिती मिळाली. कुंभरे यांचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्यासी नंदकिशोर यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद असल्याने खरी हकीकत काय आहे हे कळू शकले नाही.नंतर नंदकिशोर आणि नातेवाईकांनी घटनास्थळ गाठून सदर घटनेची माहिती त्या ठिकाणी छबिलाल व्यक्तिरिक्त काम करणाऱ्या कामगारांना विचारली असता कुणीही काहीच बोलले नाही असे त्यांचे म्हणणे आहे.यावरून जर कुंभरे यांचा या घटनेसी काहीही संबध नाही तर ते आपला फोन बंद करून कुठे गायब झाले आहेत असा प्रश्न उपस्थित करून हा अपघात की घातपात असा संशय व्यक्त करून या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी असी मागणी नंदकिशोर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.ज्या ठिकाणी गार्डन चे काम सुरू होते त्या ठिकाणी एक बोरवेल चा केबल असल्यामुळे कामास अडथळा निर्माण होत होता.तो केबल बांबूच्या साहाय्याने वर उचलून बाजूला करतेवेळी वरून जाणाऱ्या हाय होलटेज विद्युत तारेला बांबूचा स्पर्श होऊन छबिलाल यांचा मृत्यू झाला.या घटनेत आणखी एक महिला आणि पुरुष कामगाराला करंट लागला होता मात्र ते आता सुरक्षित असल्याची माहिती आहे.