
बुटीबोरी, १२ जुलै तुमची गाडीचे चाक पंचर झाले असल्याचे सांगत एका आरोपीने किराणा व्यापायाकडील दीड लाख रुपये चोरून नेले.

ही घटना पोलिस स्टेशन अंतर्गत घडली.अनिल विठ्ठलदास मनियार असे फिर्यादी किराणा व्यापाऱ्याचे नाव आहे.

हिंगणा निवासी अनिल मनियार यांचे बुटीबोरीत किराणा दुकान आहे.

त्याच दुकानातील सामान विकल्यानंतर आलेले रोख दीड लाख रुपये त्यांनी एका बॅगमध्ये टाकले व ते एमएच ४० बीजे ७३४१ क्रमांकाच्या कारने निघाले.

तेवढ्यात एक अनोळखी इसम आला व त्याने सांगितले की, तुमच्या गाडीचे मागचे चाक पंचर झाले आहे. आता ही सूचना मिळताच अनिल मनियार बाहेर गेले व त्यांनी कारचे चाक पाहिले. दरम्यान, बाजूच्या सीटवर रोख दीड लाख रुपये ठेवलेल्या बॅगविषयी ते गाफील राहिले.

हीच संधी साधत अनिल मनियार यांची ती बॅग अज्ञात आरोपीने अलगदपणे चोरली आणि पळ काढला. इकडे टायर पंचर झाल्याने त्यांनी त्रागा करीत ते दुरुस्त केले. त्यानंतर ते कारमध्ये बसले तेव्हा त्यांना रोख रकमेची आठवण झाली. पण तोपर्यंत आरोपी तेथून खूप दूर निघून गेला होता. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या गुन्हा दाखल केला आहे