बुटीबोरी, वार्ताहर. नागपूर ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक रमेश धुमाळ यांच्या आदेशानुसार केंद्राचे समादेशक राजकुमार मसुरकर,

प्रशासकीय अधिकारी अनिल यादव यांच्या मार्गदर्शनात बुटीबोरी येथील होमगार्ड दलाच्या वतीने वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या औचित्याने होमगार्ड दलातर्फे बुटीबोरी पोलिस स्टेशनमध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात होमगार्ड जवान व इतर मान्यवरांनी रक्तदान करुन आपली सामाजिक बांधीलकी जपली.

होमगार्ड जवानांच्या वतीने बोरखेडी (रेल्वे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी बुटीबोरीचे पोलिस निरीक्षक प्रताप भोसले,
सामाजिक कार्यकर्ते अरुण तिमांडे प्रामुख्याने उपस्थित होते.