butibori

ग्रेनाईडची वाहतूक करणाऱ्या ट्रेलरसह आयसर वाहन रोडवर पलटले

मोठा अपघात टळला,जीवहानी नाही
राष्ट्रीय महामार्गावरील मोहगाव शिवारातील घटना

बुटीबोरी शहर -नागपूर मार्गे ग्रेनाईडची वाहतूक करत असलेल्या ट्रेलर चा पुढील टायर फुटल्यामुळे चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले.ट्रेलर दुभाजकाला धडकुन महामार्गावर पलटले.त्याच दरम्यान नागपूर वरून बुटीबोरी मार्गे येत असलेल्या मालवाहतूक आयसर वाहन चालकाची तारांबळ उडाली.ट्रेलर पासून बचावाकरिता आयसर चालकाने आपल्या वाहनाचे कचकचून ब्रेक मारल्यामुळे त्याचेसुद्धा आपल्या वाहनावरून नियंत्रण सुटून रोडवर कोसळले.

tvs ayansh

ही घटना सकाळी 6 march 2022 सात च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी पोलिस हदीतील मोहगाव शिवारात घडली.या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवहानी झाली नाही.


प्राप्त माहितीनुसार घटना असी की घटनादिनी घटनावेळी बुटीबोरी-नागपूर दिशेने ग्रेनाईड भरून जात असलेल्या ट्रेलर ट्रॉली क्र.पी बी ०५ ए एन ८८११ चा राष्ट्रीय महामार्गावरील मोहगाव शिवारात अचानक पुढील टायर फुटला.यात चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्यामुळे ते रस्ता दुभाजकाला धडकुन रस्त्यावर पलटले.याच दरम्यान नागपूर वरून बुटीबोरी दिशेने येत असलेल्या मालवाहतूक आयसर क्र.एम एच २७ एक्स ४३१९ च्या चालकाची तारांबळ उडाली. आयसर चालकाने अपघातापासून बचावाकरिता आपल्या वाहनाचे कचकचून ब्रेक मारले.

यात ते देखील रस्त्यावर धराशायी झाले.या घटनेत मोठा अपघात टळला असून सुदैवाने कोणतीही जीवहानी झाली नाही.मात्र दरम्यान भीषण वाहतूक कोंडी झालेली बघायला मिळाली.घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.हायड्रा आणि जे सी बी ला पाचारण करण्यात आले.

मार्गावर फुटलेल्या ग्रेनाईडची अक्षरशा हेळसांड झाली असल्याने अन्य वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.जवळपास तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांसह ओरिएंटल टोल प्लाझावरील चमुंची तब्बल सहा तास दमछाक झाली.
अखेर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली