BALAJO CONVENT SCHOOL

प्रज्ञा जिवतोडे ने रोवला बालाजी कॉन्व्हेन्टच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा : तालुका स्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धात पटकावला दुसरा क्रमांक

बुटीबोरी:- जिल्हा परिषद शिक्षण विभाग तर्फे कोरडी,बोखरा येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धात बालाजी कॉन्व्हेंट मधील प्रज्ञा जीवतोडे या विद्यार्थिनीने दृतिय क्रमांक पटकावून बालाजी कॉन्व्हेन्टच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा रोवला आहे.


बालाजी कॉन्व्हेन्ट प्राथ शाळा वर्ग ७ वी सेमी मधील प्रज्ञा सेवक जिवतोडे रा.सातगाव या ग्रामीण भागात राहणाऱ्या या विद्यार्थिनीने जिल्हा परिषद शिक्षण विभाग पंचायत समिती नागपूर तर्फे कोरडी,बोखरा येथील नारायणा विध्यालयम येथे दिनांक २३ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविण्याचे यश खरच कौतुकास्पद आहे या बाबीची दखल घेत आज शाळेत या विद्यार्थिनीचा सत्कार सोहळा पार पडला.शाळेचे मुख्याध्यपक निखिल साबळे यांनी प्रज्ञाला पुष्प गुच्छ व भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीस अनेक शुभेचछा दिल्या याप्रसंगी शाळेतील शिक्षक माधुरी केराम,तुषार सरोदे,नितीन वाटमोडे,रोहन तावरे,व नितीन कुरई प्रामुख्याने उपस्थित होते.


अवांतर वाचन करणे हा प्रज्ञाचा छंद आहे.निरंतर अनेक विषयांचे वाचन केल्याने आज हे यश संपादन करता आले या यश मध्ये माझ्या पालकांचा व आपल्या गुरुजनांचा मौलाचा वाटा आहे असे मत सत्कार सोहळ्या प्रसंगी प्रज्ञानी व्यक्त केले.प्रज्ञाने आपल्या शाळेसह आपल्या गावांचे नाव उज्वालित केले आहे आज अनेक माध्यमाद्वारे कौतुक आणि शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.


प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी काही तरी गुण कौशल्य विकसित होत असतात त्यांचे कौशल्य ओळखून त्यांच्या गुणांना चालना देणे हे प्रत्येक शाळेचे व शिक्षकांचे कर्तव्य आहे.अशा स्पर्धेतून प्रज्ञा जीवतोडे या विद्यार्थिनीने लहान वयात केलेली कामगिरी खरच अतुलनीय आहे ज्यामुळे आपल्या शाळेच्या व गावाच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा प्रज्ञाने रोवला आहे असे मत मुख्याध्यापक निखिल साबळे यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *