बालाजी कॉन्व्हेन्टच्या विद्यार्थ्यानी रोवला ड्युबॉल चॅम्पियनशिपमध्ये शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा.

बुटीबोरी :- राजस्थान जयपूर शहरातील चौगान स्टेडियमवर राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या आठवी ज्युनियर रड्युबॉल चॅम्पियनशिपचेर आयोजन करण्यात आले असता बुटीबोरीतील बालाजी कॉन्व्हेन्ट मधील विद्याथ्यांनी बुटीबोरी शहराचे नाव लौकीक करत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

नुकत्याच राजस्थान जयपूर शहरात येथे डोज बॉल चॅम्पियनशिपचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असता अनेक राज्यातील शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. त्यामधे बुटीबोरीतील श्वालाजी कॉन्व्हेन्टरमधील विद्यार्थी सुध्दा सहभागी झाले. या स्पर्धेत अक्षरा गायकवाड व तेजस्वी सोनेकर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत प्रथम क्रमांक तर मुलानं मध्ये बालाजी मधील प्रशिल गजभिये व प्रज्वल वाकडेकर ने तिसरा क्रमांक पटकावला.

विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले विद्यार्थ्याच्या चमकदार कामगिरीने त्यांच्यावर अनेक स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. बालाजी कनिष्ठ महाविद्यालयचे मुख्याध्यापक प्रवीण भोयर व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा हरतालकर मॅडम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचा शाळेच्या प्रांगणात सत्कार करून मुलांनी निवडलेल्या क्षेत्रात त्यांनी भविष्यात अनेक शिखरे गाठावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
तर शाळेचे संचालक डॉ. प्रकाश नेऊलकर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्या दिल्या. कार्यक्रमाचे संचालन राजेश पवार यांनी केले. याप्रसंगी शेकडो विद्यार्थी व शाळेतील समस्त शिक्षक उपस्थित होते. विजेत्या विद्यार्थ्यांनी सांगितले की लहानपणा पासूनच अभ्यासा सोबत खेळन्याची आवड व जिद्दीमुळे आज हे शक्य झाले. आहे. या पूर्वी छोटया मोठ्या स्पर्धेत आम्ही सहभाग घेतला. परंतु पर राज्यात जाऊन जयपूर सारख्या मोठ्या शहरात आयोजित स्पर्धेत आपले स्किल दाखविण्याची संधी आम्हाला मिळाली तेव्हा आई वडिलांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला व शाळेतील शिक्षकांनी आमचा आत्मविश्वास वाढविला. त्यामुळे आज आम्ही हे यश संपादन करू शकलो. या स्पर्धेत आम्हाला मिळालेला अनुभव खूप वेगळाच होता व तो सदैव आम्हाला प्रेरणा देत राहील. असे मत विजेत्या अक्षरा, तेजस्वी, प्रशील प्रज्वल, यांनी व्यक्त केले.