butibori borkhedi railway

बोरखेडी (रेल्वे) येथे ग्रा प भवन व शाळा वर्गखोलीचा लोकार्पण सोहळा संपन्न

नागपूर/२३जाणे:- तालुक्यातील बोरखेडी (रेल्वे) येथे शनिवार दि २२ जाणे ला नवीन ग्रामपंचायत भवन व शाळा वर्गखोली बांधकामाचा लोकार्पण सोहळा हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांच्या हस्ते पार पडला.


यावेळी आ समीर मेघे यांच्या हस्ते जिल्हा वार्षिक जनसुविधांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत सण २०१९-२० या वर्षात बांधकाम करण्यात आलेल्या ग्रामपंचायत भवन व जिल्हा खनिज निधी अंतर्गत शाळा वर्गखोली बांधकाम आदी कामाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी ग्रा प बोरखेडी येथे लिपिक पदावर काम करीत असतांना पदोन्नती होऊन ग्रामसेवक झालेल्या कृष्णा काळे यांचा ग्रा प बोरखेडीच्या माध्यमातून आ समीर मेघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून आ समीर मेघे,अध्यक्ष म्हणून बुटीबोरी नगरपरिषद चे नगराध्यक्ष बबलू गौतम तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नागपूर जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे,बुटीबोरी नगरपरिषद चे शिक्षण सभापती विनोद लोहकरे,पाणी पुरवठा व मलनिस्सारण सभापती मंदार वानखेडे,प स सदस्य नितीन देवतळे,माजी प स सदस्य उर्मिला मिलमिले,भाजपा नागपूर ग्रामीण महामंत्री अनिल ठाकरे,माजी सरपंच गीता घाटे,दीपक गुर्जर,दहेली ग्रा प सरपंच रंजना कलवडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.बोरखेडी (रेल्वे) च्या विकासाकरिता आम्ही कटिबद्ध असून आम्ही सदैव विकासनिधी उपलब्ध करू असे आश्वासन आ समीर मेघे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना केले.यावेळी या कार्यक्रमाला रामदास झाडे,चंद्रकला सुरकार,वसंत नंदनवार,कृष्णा ढोके,अशोक मानकर,कृष्णा काळे,वासुदेव घोडमारे,ग्रा प सदस्य बंडू गोटे,हरीश फंड,कमलेश मुन,देवकी इवनाते,महेंद्र कुंभरे,सुदर्शना डंभरे,वैशाली ढोके,दिलीप फंड,योगेश नंदनवार,शंकर भोजने,नागेश उपरे,किशोर मिलमीले,मारोतराव भोयर,चंदूजी मसुरकर,अभय मुन तसेच गावातील शेकडो नागरिक व शाळेतील शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच राजू घाटे,उपसरपंच प्रभा मानकर,सचिव प्रज्ञा सोरदे,सुधाकर पानघाटे सर्व ग्रा प सदस्यांनी परिश्रम घेतले. butibori news

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *